मयत व्यक्तीच्या ‘या’ वस्तू चुकूनही वापरू नका ! नाहीतर….; मयत व्यक्तींच्या वस्तूंबाबत गरुड पुराण काय सांगत पहा?

काही लोक व्यक्ती मरण पावल्यानंतर त्याची आठवण म्हणून काही वस्तू स्वतःजवळ ठेवतात. आठवण म्हणून आपण मयत व्यक्तीचे फोटो किंवा त्यांच्या इतर काही आवडीच्या वस्तू स्वतः जवळ ठेवतो. पण गरुड पुरानात मयत व्यक्तीच्या काही वस्तू स्वतःजवळ ठेवण्यास आणि वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

Published on -

Garud Puran : अनेकजण आपल्या परिवारातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची आठवण म्हणून एखादी वस्तू आपल्याजवळ ठेवतात. महत्त्वाची बाब म्हणजे त्या वस्तूचा सर्रास वापर सुद्धा केला जातो. पण गरुड पुराणात मयत व्यक्तीच्या काही वस्तू वापरण्यास स्पष्ट मनाई करण्यात आले आहे.

खरे तर गरुड पुराण हे हिंदू सनातन धर्मातील एक अति महत्त्वाचा पौराणिक ग्रंथ आहे. यात मृत्यूनंतर काय होत? आत्म्यावर कर्माचा कसा प्रभाव पडतो या सर्व बाबींची माहिती देण्यात आली आहे.

याशिवाय मयत व्यक्तींच्या कोणत्या वस्तू वापरू नयेत याबाबतही गरुड पुराणात डिटेलमध्ये माहिती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आज आपण मयत व्यक्तीच्या कोणत्या वस्तू चुकूनही वापरू नये याबाबतची माहिती या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मयत व्यक्तीच्या या वस्तू चुकूनही वापरू नये 

चप्पल किंवा बूट : मृत व्यक्ती तुमचा कितीही जवळचा असला तरी देखील त्या व्यक्तीची चप्पल किंवा बूट वापरू नये. मयत व्यक्तीची चप्पल किंवा बूट घालणे अशुभ मानले गेले आहे.

यामुळे पितृदोषाची समस्या उभी राहते असे गरुड पुराणात म्हटले गेले आहे. त्यामुळे जर तुमच्याही घरात मयत व्यक्तीची चप्पल किंवा बूट असेल तर ती तुम्ही टाकून द्यायला हवी.

कपडे : आपण आपल्या अंगात कपडे घालतो आणि त्यात आपली ऊर्जा संचारत असते. अशा परिस्थितीत मयत व्यक्तींचे कपडे सुद्धा वापरणे चुकीचे आहे. मयत व्यक्तींच्या कपड्यांमध्ये त्यांची ऊर्जा असते आणि त्या व्यक्तीच्या अनमोल अशा आठवणी सुद्धा त्यात असतात.

मयत व्यक्तीच्या चांगल्या वाईट आठवणी त्या कपड्यांमध्ये असतात म्हणून मृत पावलेल्या व्यक्तीचे कपडे चुकूनही वापरू नये असे गरुड पुराणात म्हटले गेले आहे. यामुळे तुम्हाला मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो. मृत व्यक्तीची आठवण म्हणून त्याचे कपडे घालणे सुद्धा फार चुकीचे आहे.

घड्याळ : कपडे चप्पल बूट याप्रमाणेच मृत व्यक्तीचे घड्याळ वापरणे सुद्धा चुकीचे असल्याचे गरुड पुराणात म्हटले गेले आहे. गरुड पुराण असे सांगते की घड्याळासोबत मृत व्यक्तीची ऊर्जा जोडलेली असते.

त्यामुळेच मृत व्यक्तीची घडी वापरू नये. मयत व्यक्तीचे घड्याळ लाखो रुपयांचे असेल तरी देखील ते वापरू नये. असे केल्यास तुम्हाला मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!