येत आहे चार वर्षाची वारंटी असलेला जगातील पहिला स्मार्टफोन; काय असतील यामध्ये वैशिष्ट्ये आणि विशेषता? वाचा माहिती

Ajay Patil
Published:
moto s50 neo smartphone

जागतिक बाजारपेठेत आणि भारतामध्ये अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून वेगवेगळी वैशिष्ट्य असलेले स्मार्टफोन लॉन्च करण्यात येत असून यामध्ये परवडणाऱ्या किमतीपासून तर अगदी काही लाखो रुपयांपर्यंत किंमत असलेले स्मार्टफोन आपल्याला सांगता येतील. स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांमध्ये अनेक प्रसिद्ध कंपन्या असून यामध्ये लेनोवो ही कंपनी देखील तेवढीच प्रसिद्ध आहे

व या कंपनीच्या माध्यमातून 25 जून रोजी चीन मध्ये आयोजित एका कॉन्फरन्सच्या माध्यमातून मोटोरोलाचे काही नवीन फोन लॉन्च करण्यात येणार आहेत. या कॉन्फरन्समध्येच मोटो S50 Neo लॉन्च केला जाणार आहे व त्याचे एक पोस्टर देखील आता सध्या समोर आली आहे.

Moto S50 Neo येईल चार वर्षाच्या वारंटी सोबत

लेनोवो ही कंपनी येत्या 25 जूनला चीन मध्ये आयोजित कॉन्फरन्सच्या माध्यमातून मोटोरोला या कंपनीचे काही नवीन फोन लॉन्च करणार असून यामध्ये मोटो S50 Neo स्मार्टफोन देखील लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे यासोबत ग्राहकांना चक्क चार वर्षांची वॉरंटी दिली जाणार असून हा फोन लॉन्च झाल्यानंतर जगातील पहिला स्मार्टफोन ठरणार आहे की ज्यावर चार वर्षांची वारंटी मिळणार आहे.

या संबंधी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रमोशनल पोस्टर मध्ये लिहिले आहे की या वॉरंटीमध्ये एक वर्षाची स्टॅंडर्ड वारंटी मिळणार असून त्यासोबत तीन वर्षाची एक्सटेंडेड वारंटी देखील मिळणार आहे. याआधी सर्वात जास्त वारंटी देण्याचे रेकॉर्ड हे Meizu 20 आणि 21 सिरीज सोबत होते व यावर तीन वर्षांची वारंटी देण्यात आलेली होती.

म्हणजेच या चार वर्षाच्या कालावधीमध्ये फोनला काहीही झाले तरी ग्राहकांना चिंता करण्याची गरज भासणार नाही. समोर आलेल्या रिपोर्टनुसार जागतिक बाजारपेठेत हा स्मार्टफोन Moto G85 5G म्हणून लाँच केला जाणार आहे. परंतु यामध्ये जी 85 सोबत चार वर्षाची वारंटी मिळणे कठीण असून कारण हा फोन फक्त चीन पुरता मर्यादित राहण्याची शक्यता आहे.

 काय असतील Moto S50 Neo मधील संभाव्य स्पेसिफिकेशन?

प्राप्त रिपोर्टनुसार या फोनमध्ये 6.6 इंचाचा OLED कर्व्ह एज स्क्रीन मिळणार असून जी फुल एचडी+ रिझोल्युशन सोबत मिळेल आणि त्या सोबतच 120Hz रिफ्रेश रेट दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच यामध्ये एक अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील दिला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.या स्मार्टफोनमध्ये स्नॅप ड्रॅगनचा मिड रेंज चिपसेट दिला जाऊ शकतो.

बॅटरी पाहिली तर ती 5000mAh ची बॅटरी देखील मिळेल व जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते. या फोनची जाडी 7.59 मीमी असू शकते. उत्तम फोटोग्राफी करिता 50 मेगापिक्सलचा डुएल कॅमेरा सेटअप मिळू शकतो तर फ्रंटला 32 मेगापिक्सलचा सेन्सर देखील दिला जाण्याची शक्यता आहे व या फोनमध्ये लेटेस्ट अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टम दिली जाऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe