फक्त 7 दिवस ते 1 वर्ष कालावधीच्या एफडीवर मिळवा 8.50 टक्के व्याज! जाणून घ्या कोणती बँक देत आहे अधिक फायदे?

बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या एकूण गुंतवणूक पर्यायामध्ये मुदत ठेव योजना म्हणजेच एफडी हा सर्वात लोकप्रिय आणि सुरक्षित असा पर्याय मानला जातो. आपल्याला माहित आहे की प्रत्येक बँकेच्या माध्यमातून एफडी योजना राबवल्या जातात व यातील व्याजदर देखील वेगवेगळे असतात.

Ajay Patil
Published:
fd scheme

Bank FD Interest Rate:- बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या एकूण गुंतवणूक पर्यायामध्ये मुदत ठेव योजना म्हणजेच एफडी हा सर्वात लोकप्रिय आणि सुरक्षित असा पर्याय मानला जातो. आपल्याला माहित आहे की प्रत्येक बँकेच्या माध्यमातून एफडी योजना राबवल्या जातात व यातील व्याजदर देखील वेगवेगळे असतात.

आपल्याला माहित आहे की बँकेत केलेल्या एफडीवर मिळणारा व्याजदर हा तुम्ही एफडी तुम्ही किती कालावधी करिता एफडी करत आहात त्यावर देखील अवलंबून असतो. तसेच सामान्य नागरिकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याजदर मिळतो. कालावधीनुसार जर बघितले तर सात दिवसाच्या कालावधीपासून एफडी करता येते.

या अनुषंगाने तुम्हाला जर एफडी करायची असेल तर यामध्ये कोणती बँक किती कालावधीसाठी किती व्याजदर देते हे तुम्हाला माहीत असणे खूप गरजेचे आहे. म्हणूनच या लेखामध्ये आपण सात दिवस ते बारा महिन्याच्या एफडीवर कोणती बँक सर्वात जास्त व्याज देत आहे? याबद्दलची माहिती बघणार आहोत.

सात दिवस ते एक वर्षाच्या एफडीवर कोणती बँक देत आहे सर्वात जास्त व्याज?

1- एचडीएफसी बँक- एचडीएफसी बँक ही देशातील एक महत्त्वपूर्ण बँक असून या बँकेत जर तुम्ही सात दिवसापासून ते एक वर्षापेक्षा कमी कालावधी करिता एफडी केली तर बँक त्यावर तीन टक्क्यांपासून ते सहा टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे.

2- आयसीआयसीआय बँक- आयसीआयसीआय बँकेमध्ये जर तुम्ही सात दिवसापासून ते एक वर्ष कमी कालावधीकरिता जर एफडी केली तर सामान्य नागरिकांना तीन टक्क्यांपासून ते सहा टक्के पर्यंत व्याजदर देते.

3- येस बँक- खाजगी क्षेत्रातील महत्त्वाची असलेली येस बँकेत जर तुम्ही सात दिवस ते एक वर्ष या कालावधीकरिता एफडी केली तर सामान्य नागरिकांना ही बँक दिलेल्या एफडीवर 3.25% ते 7.25 टक्के दरम्यान व्याज देत आहे.

4- स्टेट बँक ऑफ इंडिया- स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआय देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे व या बँकेत जर तुम्ही सात दिवस ते एक वर्ष या कालावधी करिता एफडी केली तर ही बँक सामान्य नागरिकांना तीन टक्के ते 5.75% पर्यंत व्याज देत आहे.

5- पंजाब नॅशनल बँक- ही बँक सर्वसामान्य नागरिकांना सात दिवस ते एक वर्ष कालावधीच्या एफडीवर तीन टक्के ते सात टक्के दरम्यान व्याज देत आहे.

6- कॅनरा बँक- कॅनरा बँक देखील देशातील एक महत्त्वाची बँक आहे व या बँकेत जर तुम्ही सात दिवस ते एक वर्ष कालावधी करिता एफडी केली तर सामान्य नागरिकांना 4% पासून ते 6.85% पर्यंत व्याज मिळत आहे.

स्मॉल फायनान्स बँक

1- युनिटी स्मॉल फायनान्स बँक- लघु वित्त बँकांच्या श्रेणीमध्ये युनिटी स्मॉल फायनान्स बँक ही एक महत्वपूर्ण बँक असून या बँकेत जर तुम्ही सात दिवस ते एक वर्ष या कालावधीसाठी एफडी केली तर तुम्हाला 4.50 टक्क्यांपासून ते 7.85 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते.

2- जन स्मॉल फायनान्स बँक- जन स्मॉल फायनान्स बँक सर्वसामान्य नागरिकांकरिता सात दिवस ते एक वर्ष या कालावधीसाठी तीन टक्के ते 8.50% पर्यंत व्याज देत आहे.

3- सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक- सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ही एक महत्त्वाची बँक असून या बँकेत जर तुम्ही सात दिवस ते एक वर्ष या कालावधी करिता एफडी केली तर ही बँक तुम्हाला चार टक्क्यांपासून ते 6.85 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe