घटस्थापनेचा मुहूर्त साधा आणि उत्तम फीचर्सवाला स्मार्टफोन घ्या! अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये मिळत आहे ‘या’ 4 स्मार्टफोनवर डिस्काउंट

अमेझॉनने देखील ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल 2024 अंतर्गत काही स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट ऑफर दिली आहे. यासोबतच नो कॉस्ट ईएमआय वर स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी देखील ग्राहकांना मिळणार आहे.

Published on -

सणासुदीचा कालावधी म्हटला म्हणजे यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. ही खरेदी कपड्यांपासून तर स्मार्टफोन तसेच कार,बाईक आणि स्कूटरची सुद्धा केली जाते. त्यामुळे या कालावधीत अनेक कंपन्यांच्या माध्यमातून अनेक डिस्काउंट ऑफर देखील दिल्या जातात व ग्राहक वळवण्याचा प्रयत्न कंपन्यांचा असतो.

महत्वाचे म्हणजे याच कालावधीत ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देखील फेस्टिवल सेल आयोजित केले जातात व यामध्ये अनेक प्रकारच्या स्मार्टफोनवर आपल्याला बंपर अशा सवलती मिळत असतात व अनेक उत्तम वैशिष्ट्य असलेले महागडे फोन कमीत कमी किमतीमध्ये मिळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होत असते.

अगदी याच मुद्द्याला धरून जर बघितले तर अमेझॉनने देखील ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल 2024 अंतर्गत काही स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट ऑफर दिली आहे. यासोबतच नो कॉस्ट ईएमआय वर स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी देखील ग्राहकांना मिळणार आहे. त्यामुळे ॲमेझॉनच्या या सेलमध्ये कोणत्या स्मार्टफोनवर सवलत मिळणार आहे याबाबतची माहिती आपण बघू.

 अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल 2024 मध्ये मिळत आहे या स्मार्टफोनवर सूट

1- वनप्लस नॉर्ड CE 4 Lite- हा एक उत्तम स्मार्टफोन असून यामध्ये 256 जीबी स्टोरेज आणि आठ जीबी रॅम मिळते तसेच बॅटरी बघितली तर ती 5500mAh स्वरूपाचे देण्यात आली असून यामध्ये 80W सुपरवॉक चार्जर देण्यात आलेला आहे.

50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा या स्मार्टफोनमध्ये असून याची किंमत 19 हजार 999 रुपये आहे. परंतु हा स्मार्टफोन तुम्ही ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल 2024 सेल मधून घेतला तर तुम्हाला तो 16 हजार 999 मध्ये मिळणार आहे.

2- सॅमसंग गॅलेक्सी S23 अल्ट्रा 5G- या स्मार्टफोनमध्ये 6.8 इंच डिस्प्ले देण्यात आला असून स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 चिपसेट यामध्ये देण्यात आला आहे.तसेच हा प्रीमियम स्मार्टफोन असून यामध्ये एक टीबी पर्यंत स्टोरेज आणि 12 जीबी पर्यंत रॅम मिळते.

मिळणारी ऑफर बघितली तर या स्मार्टफोनच्या 256 जीबी व्हेरियंटची किंमत एक लाख 49 हजार 999 रुपये आहे. परंतु या सेलमध्ये तुम्हाला तो फक्त 84 हजार 999 मध्ये खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

3- रियलमी नार्जो 70x 5G स्मार्टफोन या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला सहा जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आले असून डिस्प्लेमध्ये 120Hz रिफ्रेश रेट मिळतो व डायमेन्ससिटी 6100+ प्रोसेसर देण्यात आला आहे व फोटोग्राफी करिता 50 मेगापिक्सल एआय कॅमेरा आहे.

हा स्मार्टफोन पंधरा हजार रुपये किमतीच्या सेगमेंट मधील स्मार्टफोन असून या सेलमध्ये तुम्हाला तो 13498 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

4- रेडमी 13c 5G स्मार्टफोन या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला आठ जीबी रॅम २५६ जीबी स्टोरेज मिळते. यासोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्स 50 मेगापिक्सल चा कॅमेरा देण्यात आलेला आहे.

या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6100+ 5G प्रोसेसर दिला आहे. या स्मार्टफोनची किंमत बघितली तर ती 13999 रुपये आहे. परंतु ॲमेझॉनच्या या फेस्टिव सेलमध्ये तुम्ही त्याला 9199 रुपयांना खरेदी करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!