‘अशा’ पद्धतीने घरबसल्या घ्या आपल्या वाहनांसाठी व्हीआयपी नंबर

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:- आपल्या वाहनासाठी आपल्याला विशेष क्रमांक म्हणजेच व्हीआयपी क्रमांक हवा असल्यास आपणास तो सहज मिळेल. लोकांना काही स्पेशल नंबरची आवड असते किंवा त्यांना तो नम्बर भाग्यवान असल्याचे सिद्ध होते.

अशा परिस्थितीत लोकांना त्यांच्या वाहनावर त्याच नंबरची एक खास प्लेट हवी असते. लोक तो नंबर मिळवण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यासही तयार असतात. तथापि, व्हीआयपी क्रमांक मिळविणे फार कठीण नाही.

असे बरेच नम्बर आहेत कि ज्यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि लोक या विशेष नंबरसाठी महत्त्वपूर्ण रक्कम खर्च करण्यास तयार आहेत.

लोकांच्या मनात असा प्रश्न पडतो की हे क्रमांक कसे लागू केले जातात. तर आम्ही तुम्हाला याचा संपूर्ण मार्ग सांगत आहोत, घरी बसूनही तुम्ही हे करू सहज करू शकता.

 हा आहे मार्ग –

  • parivahan.gov.in या केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • – यानंतर, होम पेजवरील मेनूमधील ‘फॅन्सी नंबर प्लेट’ वर क्लिक करा.
  • – यूजर आईडी जनरेट करण्यासाठी ‘‘New Public User’’ वर क्लिक करा
  • – यूजर आईडीद्वारे लॉग इन करा
  • – येथे नंबरचे अमाउंट लिहिलेले असेल
  • – नंबर सेक्शनमध्ये क्लिक करा आणि जवळचा आरटीओ निवडा.
  • – वाहन श्रेणी निवडा
  • – आपल्या आवडीच्या विशेष क्रमांकाची सीरीज निवडा
  • -असे केल्यावर आपल्यासमोर विशेष क्रमांकाची यादी येईल आणि समोर किंमत लिहिले जाईल.
  • – आता ‘Continue to register’ वर क्लिक करा
  • – आता आपल्यासमोर एक फॉर्म उघडेल आणि तो भरून सबमिट करा
  • – नेट बँकिंगद्वारे पैसे द्या
  • – एक स्लिप मिळेल जी आपला खास नंबर आपल्या नावे नोंदविला गेला याचा पुरावा असेल.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe