Tata Tiago EV Offer:- दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अनेक वाहन उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून आकर्षक अशा ऑफर्स ग्राहकांसाठी आणल्या असून या ऑफरतर्गत कार खरेदीवर अनेक प्रकारच्या बंपर अशा सवलती दिल्या जात आहेत.
यासोबतच ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर देखील घरगुती वापराच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपासून तर कार व बाईक्स खरेदीवर आकर्षक अशा सूट मिळत आहेत.

त्यामुळे या दिवाळीमध्ये तुम्हाला देखील इलेक्ट्रिक कार घ्यायची असेल तर टाटा मोटर्सच्या माध्यमातून त्यांच्या इलेक्ट्रिक कारवर दिवाळी ऑफर अंतर्गत बंपर अशी सूट देण्यात येत असून ही सूट टाटा टियागो इव्ही वर दिली जात आहे.
या सवलत व्यतिरिक्त टाटा टियागो ईव्ही खरेदी केली तर पुढील सहा महिन्यांकरिता टाटा पावर स्टेशन कडून मोफत चार्जिंगची ऑफर देखील कंपनीच्या माध्यमातून दिली जात असून ही दोन्ही प्रकारची ऑफर 31 ऑक्टोबर पर्यंत मिळणार आहे.
टाटा टियागो ईव्हीवर मिळत आहे 75 हजार रुपयांचे सवलत
टाटा मोटर्सच्या माध्यमातून टाटा टियागो ईव्ही वर तब्बल 75 हजार रुपयांपर्यंतची सूट दिली जात असून त्यासोबतच हे वाहन खरेदी केल्यानंतर पुढील सहा महिन्यां करिता टाटा पावर स्टेशन कडून मोफत चार्जिंगची ऑफर देखील देण्यात आलेली आहे. कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली ही ऑफर 31 ऑक्टोबर पर्यंत दिली जाणार आहे.
टाटा टियागो ईव्हीमध्ये कशा पद्धतीचे आहेत बॅटरी पॅक?
कंपनीने या इलेक्ट्रिक कारमध्ये दोन बॅटरी पॅकचे पर्याय दिले असून टाटाची ही इलेक्ट्रिक कार 19.2 kWh बॅटरी पॅकच्या पर्याय येते व त्याचे मध्यम श्रेणीचे प्रकार आहेत. या बॅटरी पॅकसह ही कार एका चार्जिंग मध्ये 221 किलोमीटरची रेंज देण्याचा दावा कंपनीच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
तसेच दुसरा बॅटरी पॅक हा 24 kWh चा देण्यात आला असून या बॅटरी पॅकमध्ये एका चार्जिंगवर ही कार २७५ किलोमीटरचे अंतर कापू शकते. टाटा मोटरच्या या इलेक्ट्रिक कारमध्ये फास्ट चार्जिंगची सुविधा दिली असून हे 58 मिनिटात पूर्ण चार्ज होऊ शकते.
कसे आहेत टाटा टियागो ईव्हीचे इंजिन?
टाटा मोटर्सच्या माध्यमातून या इलेक्ट्रिक कारमध्ये दोन बॅटरी पॅक पर्याय देण्यात आले आहेत व त्यासोबत लिक्विड कुल्ड इजिनसह ही कार सुसज्ज आहे. या इंजिनसह मध्यम श्रेणीच्या प्रकारांना 60 बीएचपी पावर आणि 110 एनएम टॉर्क जनरेट करते.
लॉन्ग रेंज व्हेरियंटमध्ये 73 बीएचपीची पावर आणि 114 एनएमचा टॉर्क जनरेट करण्यास ही कार सक्षम आहे. या कारमध्ये मल्टीमोड रिजनरेशन ब्रेकिंगचे वैशिष्ट्ये देखील देण्यात आले आहे.
या इलेक्ट्रिक कार मध्यम श्रेणीच्या प्रकारासह 6.2 सेकंदात 0 ते 60 किमी प्रति तासाचा वेग गाठू शकते. तर लॉंग रेंज व्हर्जनमध्ये शून्य ते साठ किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठण्यासाठी या कारला 5.7 सेकंद लागतात.
किती आहे टाटा टियागो इलेक्ट्रिक कारची किंमत?
टाटा टियागो इलेक्ट्रिक कारचे जवळपास सात प्रकार बाजारात उपलब्ध असून ही कार पाच रंगांच्या पर्यायांमध्ये येते. या कारमध्ये टिल ब्लू, टॉपिकल मिस्ट,डेटोना ग्रे, प्रिस्टाइन व्हाईट आणि मिडनाईट प्लम अशा रंगांचे पर्याय देण्यात आले आहेत. या कारवर आठ वर्षांची वारंटी उपलब्ध करून देण्यात आलेली असून या कारची एक्स शोरूम किंमत सात लाख 99 हजार रुपयांपासून सुरू होते.