Gold Price Today : आज महाराष्ट्रात सगळीकडे आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न होतोय. दरम्यान देवशयनी एकादशी अर्थातच आषाढी एकादशीच्या दिवशी जर आपणास सोन खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची राहणार आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार सुरू आहेत.
एखाद्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होते तर एखाद्या दिवशी याच्या किमतीत मोठी घसरण सुद्धा पाहायला मिळते. खरे तर 23 जून 2025 रोजी या मौल्यवान धातूची किंमत एका लाखाच्या वर होती. मात्र 24 तारखेपासून याच्या किमतीला उतरती कळा लागली.

30 जून 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार 260 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती. मात्र जुलै ची सुरुवात झाली आणि पुन्हा एकदा किंमत वाढू लागली. एक जुलै ते 3 जुलै दरम्यान सोन्याच्या किमतीत सतत वाढ झाली. परंतु चार तारखेला याच्या किमतीत घसरन दिसली.
चार जुलै 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत दहा ग्रॅम मागे 600 रुपयांनी आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत दहा ग्राम मागे 550 रुपयांनी कमी झाली. परंतु काल पुन्हा एकदा याच्या किमतीत वाढ पाहायला मिळाली आहे. दरम्यान आता आपण सहा जुलै 2025 रोजी 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे रेट कसे आहेत याचा आढावा घेणार आहोत.
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगावमधील सोन्याचे रेट
राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या शहरांमध्ये आज आषाढी एकादशीच्या दिवशी 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,130 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 90,600 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे तसेच 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 98 हजार 830 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. अर्थातच आज राज्यातील या प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किमतीत कोणताच बदल झालेला नाही.
नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडीमधील सोन्याचे रेट कसे आहेत?
या शहरांमध्ये आज आषाढी एकादशीच्या दिवशी 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,160 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 90,630 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे तसेच 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 98 हजार 860 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. अर्थातच आज राज्यातील या प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किमतीत कोणताच बदल झालेला नाही.