Gold Price Today : 11 जानेवारीपासून ते 15 जानेवारीपर्यंत सोन्याच्या किमतीत मोठी तेजी पाहायला मिळाली. 11 जानेवारी 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 98 हजार चारशे रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.
15 जानेवारी 2025 रोजी शुद्ध सोन्याची किंमत एक लाख एक हजार 680 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती. 16 तारखेला मात्र दहा ग्रॅम मागे शुद्ध सोन्याची किंमत 170 रुपयांनी कमी झाली. तसेच काल 17 जून 2025 रोजी या मौल्यवान धातूच्या किमतीत 10 ग्रॅम मागे 1140 रुपयांची घसरण झाली.

पण आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किमतीत मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. म्हणूनच, आता आपण या मौल्यवान धातूचे सध्याचे रेट कसे आहेत याचा आढावा जाणून घेणार आहोत.
17 जून रोजी सोन्याचे रेट कसे होते?
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव : 17 जून 2025 रोजी या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 280 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 370 रुपये प्रति दहा ग्राम एवढी नमूद करण्यात आली.
नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी : 17 जून 2025 रोजी या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 310 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 30 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 400 रुपये प्रति दहा ग्राम एवढी नमूद करण्यात आली.
आजचे सोन्याचे रेट कसे आहेत ?
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव : 18 जून 2025 रोजी या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 690 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 500 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 910 रुपये प्रति दहा ग्राम एवढी नमूद करण्यात आली.
नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी : 18 जून 2025 रोजी या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 720 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 530 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 940 रुपये प्रति दहा ग्राम एवढी नमूद करण्यात आली.