Gold Rate : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. 23 जून रोजी सोन्याची किंमत एका लाखाच्या वर होते मात्र त्यानंतर सातत्याने किमतीत घसरण होत राहीली. 23 जून पासून ते 30 जून पर्यंत सोन्याच्या किमतीत सतत घसरण होत राहीली आणि सोन्याचे दर 30 जून रोजी 97 हजार रुपयांपर्यंत खाली आलेत.
मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीला या मौल्यवान धातूच्या किमतीत मोठी वाढ झाली. एक जुलै रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत दहा ग्रॅम मागे 1140 रुपयांनी आणि 22 कॅरेट ची किंमत दहा ग्रॅम मागे 1050 रुपयांनी वाढली.

दोन जुलै रोजी 24 कॅरेट आणि 22 कॅरेटची किंमत प्रति दहा ग्रॅम मागे अनुक्रमे 490 आणि 450 रुपयांनी वाढली. काल तीन जुलै 2025 रोजी सुद्धा 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 440 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट ची किंमत चारशे रुपये प्रति दहा ग्रॅमने वाढली.
महत्त्वाची बाब अशी की आज सुद्धा सोन्याच्या दरवाढीचा ट्रेंड कायम आहे आणि म्हणूनच आता आपण चार जुलै 2025 रोजी 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोना खरेदीसाठी ग्राहकांना किती पैसे मोजावे लागणार याबाबतचा आढावा घेणार आहोत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 24 कॅरेट सोन्याचे रेट
आज महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या शहरांमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 99,340 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.
त्याचवेळी नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी या शहरांमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 99,370 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. अर्थातच कालच्या तुलनेत आज महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये 24 कॅरेटचे रेट काही प्रमाणात वाढले आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 22 कॅरेट सोन्याचे रेट
आज महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 60 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.
त्याचवेळी नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 90 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. अर्थातच कालच्या तुलनेत आज महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये 22 कॅरेटचे रेट सुद्धा काही प्रमाणात वाढले आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 18 कॅरेट सोन्याचे रेट
आज महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 510 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.
त्याचवेळी नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 540 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. अर्थातच कालच्या तुलनेत आज महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये 18 कॅरेटचे रेट सुद्धा काही प्रमाणात वाढले आहेत.