Gold Rate : सोन खरेदीच्या तयारीत आहात का? अहो मग आजची बातमी खास तुमच्या कामाची आहे. खरे तर एप्रिल महिन्यानंतर सोन्याने पुन्हा एकदा एक नवा रेकॉर्ड तयार केला आहे. सोन्याच्या किमती पुन्हा एकदा एका लाखाच्या पार गेले आहेत.
22 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख एक हजार तीनशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम वर पोहोचली होती. यानंतर मात्र सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाले आणि रेट 93 हजार रुपयांपर्यंत खाली आलेत.

हळूहळू पुन्हा एकदा सोन्याचा रेटमध्ये सुधारणा झाली आणि आता सोन्याचे रेट पुन्हा एकदा एका लाखाच्या वर पोहोचले आहेत. दरम्यान गेल्या दोन दिवसांच्या काळात म्हणजेच 13 आणि 14 जून 2025 रोजी सोन्याचे रेटमध्ये तब्बल 2400 रुपयांची वाढ झाली आहे.
22 एप्रिल प्रमाणेच कालचा दिवस अर्थात 13 जून 2025 हा दिवस फारच ऐतिहासिक ठरला आहे कारण की काल पुन्हा एकदा सोन्याची किंमत एका लाखाच्या वर पोहोचली. 13 जून 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 2120 रुपये प्रति दहा ग्रॅमने वाढली आणि एक लाख एक हजार चारशे रुपयांवर पोहोचली.
दुसरीकडे 22 कॅरेट सोन्याची किंमत काल 1950 रुपयांनी वाढली, 22 कॅरेट सोने काल 92 हजार 950 रुपये प्रति दहा ग्रॅम वर पोहोचले. अशा परिस्थितीत आता आपण 14 जून 2025 रोजी 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव काय आहे याचाच आढावा या बातमीमधून घेणार आहोत.
14 जून 2025 रोजी सोन्याचे रेट किती वाढलेत
आज 14 जून रोजी 18 कॅरेट सोन्याची किंमत दहा ग्रॅम मागे दोनशे दहा रुपयांनी, 22 कॅरेट सोन्याची किंमत दहा ग्रॅम मध्ये 250 रुपयांनी आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत दहा ग्रॅम मागे 280 रुपयांनी वाढली आहे. या दरवाढीमुळे मात्र सर्वसामान्य ग्राहक मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहेत. दुसरीकडे ज्यांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली आहे त्यांना या दरवाढीचा नक्कीच फायदा होणार आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील रेट
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव : या शहरांमध्ये आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख 1,680 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार 260 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.
नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी : या शहरांमध्ये वर सांगितलेल्या शहरांपेक्षा सोन्याची किंमत अधिक राहते. मिळालेल्या माहितीनुसार आज नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी या शहरात 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख 1,710 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 230 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार 290 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.