Gold Rate Today : दहा दिवसांपूर्वी अर्थातच 3 जुलै 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 99,330 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती. गेल्या महिन्यात म्हणजेच जून महिन्यात सोन्याची किंमत एका लाखाच्या वर पोहोचली होती यामुळे जुलै महिन्यातही लवकरच सोने एका लाखाच्या वर जाणार असे वाटत होते.
पण गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सतत चढ-उतार सुरू आहेत. एखाद्या दिवशी या मौल्यवान धातूच्या किमतीत मोठी वाढ होते तर दुसऱ्या एखाद्या दिवशी याच्या किमतीत तेवढीच घसरण सुद्धा होते.

दरम्यान तीन दिवसांपूर्वी अर्थातच नऊ जुलै रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या किमतीत 660 रुपयांची आणि 22 कॅरेट च्या किमतीत 600 रुपयांची घसरण झाल्यानंतर आज सलग तिसऱ्या दिवशी या मौल्यवान धातूच्या किमतीत सतत वाढ होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 10 जुलै रोजी 24 कॅरेट ची किंमत 220 रुपयांनी आणि 22 कॅरेट ची किंमत 200 रुपयांनी वाढली. काल, 11 जुलै रोजी 24 कॅरेट ची किंमत 600 रुपयांनी आणि 22 कॅरेट ची किंमत 550 रुपयांनी वाढली.
तसेच, आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 540 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 650 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 710 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी वाढली आहे.
12 जुलैचे रेट कसे आहेत ?
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव : महाराष्ट्रातील या प्रमुख शहरांमध्ये आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,790 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,400 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,710 प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे. म्हणजे आज या शहरांमध्ये 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे रेट वाढले आहेत.
नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी : महाराष्ट्रातील या प्रमुख शहरांमध्ये आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,820 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,430 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,740 प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.