सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण ! 16 जुलै 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचे रेट कसे आहेत? वाचा सविस्तर

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार सुरू आहे. काल आणि आज सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत आता आपण या मौल्यवान धातूच्या लेटेस्ट किमती कशा आहेत याचा आढावा घेणार आहोत.

Published on -

Gold Rate : आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली आहे. काल पंधरा जुलै रोजी 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत 110 रुपयांची आणि 22 कॅरेटच्या किमतीत शंभर रुपयांची घसरण झाली होती. 14 जुलै रोजी 24 आणि 22 कॅरेट ची किंमत अनुक्रमे 99 हजार 880 रुपये आणि 91 हजार 550 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी होती.

दरम्यान काल 22 कॅरेट आणि 24 कॅरेट ची किंमत अनुक्रमे 91 हजार 450 रुपये आणि 99 हजार 770 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी होती. दरम्यान आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट ची किंमत अनुक्रमे 370 रुपये, 450 रुपये आणि 490 रुपयांनी कमी झाली आहे. अशा परिस्थितीत आज आपण 16 जुलै 2025 रोजी या मौल्यवान धातूचे लेटेस्ट रेट कसे आहेत याची माहिती पाहणार आहोत.

18 कॅरेट सोन्याचे रेट कसे आहेत?

आज मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर आणि जळगाव या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,460 रुपये प्रति 10 gm इतकी आहे. तसेच नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 490 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. 

22 कॅरेट सोन्याचे रेट कसे आहेत 

आज मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर आणि जळगाव या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार रुपये प्रति 10 gm इतकी आहे. तसेच नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 30 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. 

24 कॅरेट सोन्याचे रेट कसे आहेत?

आज 16 जुलै 2025 रोजी मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर आणि जळगाव या शहरांमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 99 हजार 280 रुपये प्रति 10 gm इतकी आहे.

तसेच नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 310 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. म्हणजेच आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या किमतीत दहा ग्रॅम मागे 490 रुपयांची मोठी घसरण झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!