Bank Recruitment 2024: महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव बँकेत क्लर्क होण्याची सुवर्णसंधी! पटकन करा अर्ज आणि मिळवा 20 हजार पगार

हाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव बँक फेडरेशन लि. अंतर्गत भरतीसाठी जाहिरात काढण्यात आलेली असून बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर याबद्दलची नोटिफिकेशन जारी करण्यात आलेली आहे.त्यामुळे या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक पात्र असतील त्यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

Published on -

Bank Recruitment 2024:- जे तरुण-तरुणी विविध प्रकारचे बँक भरती परीक्षांची तयारी करतात अशा तरुणांना सध्या सुवर्णसंधी असून विविध बँकांच्या माध्यमातून भरतीसाठी जाहिरात काढण्यात येत आहेत.

अगदी त्याच प्रकारे महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव बँक फेडरेशन लि. अंतर्गत भरतीसाठी जाहिरात काढण्यात आलेली असून बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर याबद्दलची नोटिफिकेशन जारी करण्यात आलेली आहे.

त्यामुळे या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक पात्र असतील त्यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

 महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव बँक मध्ये होणार क्लर्क पदासाठीची भरती

याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड अंतर्गत जूनियर क्लर्कचे रिक्त पदे भरली जाणार असून या पदांसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या भरती प्रक्रियेतून ज्युनिअर क्लर्क या पदासाठीच्या 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

 किती आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता?

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव बँकेच्या माध्यमातून जूनियर क्लर्क पदाच्या 12 रिक्त  जागा भरल्या जाणार आहेत व याकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कुठल्याही मान्यता प्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असणे गरजेचे आहे व इतकेच नाही तर संबंधित उमेदवाराकडे एमएस-सीआयटी किंवा समतुल्य असलेला एखादा संगणक कोर्स प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे.

 आवश्यक वयोमर्यादा

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव बँकेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या या ज्युनिअर क्लर्क पदाच्या भरतीसाठी जे इच्छुक व पात्र उमेदवार अर्ज करतील त्यांचे वय 22 ते 35 वर्षां दरम्यान असणे गरजेचे आहे.

 किती लागेल परीक्षा फी?

जे उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करतील अशा उमेदवारांना 1180 रुपये( जीएसटी सहित) परीक्षा फी भरावी लागेल.

 नोकरीचे ठिकाण आणि मिळणारा पगार

महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेतून ज्या उमेदवारांची ज्युनिअर क्लर्क पदासाठी निवड होईल त्यांना दरमहा 20760 रुपये इतका पगार मिळेल.

तसेच निवड झालेले जे काही उमेदवार असतील त्यांना जळगाव, नासिक, बुलढाणा, छत्रपती संभाजी नगर आणि धुळे येथील महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव बँकेच्या शाखेमध्ये नोकरी करावी लागणार आहे.

 काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?

महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या ज्युनिअर क्लर्क पदाच्या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता जे उमेदवार इच्छुक व पात्र असतील ते सात सप्टेंबर 2024 पर्यंत याकरिता अर्ज करू शकणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe