मोटोरोलाचा 32MP फ्रंट कॅमेरा असलेला फोन स्वस्तात घेण्याची सुवर्णसंधी! मिळेल कॅशबॅक आणि एक्सचेंज बोनस

नुकताच काही दिवसांअगोदर दिवाळी सारखा सण गेला व या सणाच्या निमित्ताने अनेक स्मार्टफोन कंपन्यांच्या माध्यमातून स्मार्टफोन खरेदीवर उत्तम अशा ऑफर्स देण्यात आलेल्या होत्या व त्यासोबतच फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देखील अशा प्रकारची खरेदीचे सुवर्णसंधी होती.

Published on -

Motorola Edge 50 Fusion Smartphone:- नुकताच काही दिवसांअगोदर दिवाळी सारखा सण गेला व या सणाच्या निमित्ताने अनेक स्मार्टफोन कंपन्यांच्या माध्यमातून स्मार्टफोन खरेदीवर उत्तम अशा ऑफर्स देण्यात आलेल्या होत्या व त्यासोबतच फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देखील अशा प्रकारची खरेदीचे सुवर्णसंधी होती.

परंतु तुम्हाला आत्ता जर उत्तम असा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही फ्लिपकार्टच्या एन्ड ऑफ सीजन सेलमध्ये खरेदी करू शकतात. तुम्हाला जर 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असलेला फोन 25 हजारापर्यंत घ्यायचा असेल तर तुमच्याकरिता मोटोरोला Edge 50 फ्युजन हा स्मार्टफोन उत्तम पर्याय ठरू शकतो.

विशेष म्हणजे तुम्हाला हा फोन फ्लिपकार्टच्या एंड ऑफ सीझन सेलमध्ये सध्या मोठ्या डिस्काउंटवर उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन अतिशय उत्तम व आकर्षक असून यामध्ये 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आलेले आहे.

या फोनची किंमत जर बघितली तर ती सध्या 24999 रुपये आहे. परंतु 13 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या flipkart च्या या एन्ड ऑफ सीझन सेलच्या माध्यमातून तुम्ही या स्मार्टफोनवर दोन हजार रुपयांच्या बँक डिस्काउंटचा लाभ मिळवू शकतात.

कसा मिळेल या सवलतीचा लाभ?
तुम्हाला जर या सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ॲक्सिस किंवा आयडीएफसी बँक क्रेडिट कार्डद्वारे नॉन ईएमआय व्यवहार करावा लागेल. कंपनीच्या माध्यमातून फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्डवर पाच टक्के कॅशबॅक देत आहे.

तसेच या फोनवर एक्सचेंज ऑफर देखील असून या ऑफरच्या माध्यमातून तुम्ही या स्मार्टफोनची किंमत 23 हजार दोनशे रुपयांपर्यंत कमी करू शकतात. परंतु एक्सचेंज ऑफर अंतर्गत जी काही सूट मिळेल ती तुमच्या जुन्या फोनची कंडिशन कशी आहे? तसेच त्याचा ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असेल.

काय आहेत मोटोरोला Edge 50 फ्युजन स्मार्टफोनची वैशिष्ट्ये?
मोटोरोलाच्या या स्मार्टफोन मध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह 6.67 इंच फुल एचडी+ पोलेड वक्र AMOLED डिस्प्ले देण्यात आलेला आहे व या डिस्प्लेची ब्राईटनेस पातळी ही 1600 नीट्स इतकी आहे.

तसेच डिस्प्लेच्या संरक्षणाकरिता गोरीला ग्लास पाच देण्यात आला आहे. तसेच या फोनची मेमरी बघितली तर बारा जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 7s Gen 2 चिपसेटवर काम करतो.

कसा आहे या फोनमध्ये देण्यात आलेला कॅमेरा?
उत्तम फोटोग्राफी करिता कंपनीने या स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसह डुएल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये तेरा मेगापिक्सल अल्ट्राव्हाइड अँगल लेंन्ससह 50 मेगापिक्सल मेन्स लेन्सचा समावेश आहे.

तसेच या स्मार्टफोनमध्ये अल्ट्राव्हाइड अँगल कॅमेरा तुम्ही मॅक्रो कॅमेरा म्हणून वापरू शकतात. उत्तम सेल्फी करिता 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आलेला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये उत्तम कॅपॅसिटी असलेली 5000mAh बॅटरी देण्यात आलेली आहे व ही बॅटरी 68 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News