भारतीय रेल्वे विभागाच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या भरतीकरिता जाहिरात काढण्यात आल्या असून यासंबंधीची भरती प्रक्रिया देखील आता राबविण्यात येणार आहेत.
त्यामुळे रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी हा कालावधी एक सुवर्णसंधी म्हणून खूप महत्त्वाचा आहे. याच अनुषंगाने भारतीय रेल्वेच्या कोकण रेल्वे विभागाने देखील दहावी, बारावी उत्तीर्ण असलेल्या व पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली
असून कोकण रेल्वे विभागांमध्ये भारतीय रेल्वेच्या माध्यमातून आता रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरतीमध्ये विविध प्रकारची रिक्त पदे भरण्यात येणार आहे व पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करणे गरजेचे आहे.
कोकण रेल्वेत होणार 190 रिक्त जागांसाठी भरती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतीय रेल्वेच्या माध्यमातून कोकण रेल्वे विभागामध्ये अनेक रिक्त पदे भरण्याकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून त्यानुसार वरिष्ठ विभाग अभियंता,
स्टेशन मास्टर तसेच कमर्शियल पर्यवेक्षक इत्यादी पदांसोबत काही इतर पदांच्या 190 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. याकरिता पदानुसार जे उमेदवार पात्र असतील त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांच्या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
पदाचे नाव आणि इतर तपशील
भारतीय रेल्वेच्या कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेमध्ये सीनियर सेक्शन इंजिनिअर पदाच्या पाच जागा, स्टेशन मास्टर पदासाठी दहा जागा, कमर्शियल सुपरवायझर पाच जागा, गुड्स ट्रेन मॅनेजर एकूण पाच जागा, टेक्निशियन III( मेकॅनिकल) एकूण 20 जागा,
टेक्निशियन III( इलेक्ट्रिकल) एकूण पंधरा जागा, ESTM-III(S&T) पदासाठी एकूण 15 जागा, असिस्टंट लोको पायलट पदासाठी 15 जागा, पॉईंट्स मन एकूण 60 जागा, ट्रॅक मेंटेनर-I पदासाठी 35 जागा अशा सगळ्या मिळून 190 रिक्त जागांवर ही भरती केली जाणार आहे.
या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता
या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी असणार आहे. या भरतीमध्ये दहावी, बारावी उत्तीर्ण व त्यासोबत कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. तसेच काही पदांसाठी बारावीत फिजिक्स आणि मॅथ या विषयात उत्तीर्ण असण्यासोबतच इंजिनिअरिंग मधील विविध विषयांमधील पदवी आवश्यक असणार आहे.
जर आपण पदवी संदर्भात पाहिले तर( सिविल/ मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल) आयटीआय ट्रेड( इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ वायरमन/ आर्मिचर आणि कॉइल वाईंडर/ फिटर/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ मेकॅनिस्ट/ डिझेल मेकॅनिक/ मेकॅनिक( मोटर वेहिकल)/ मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिक/ मेकॅनिक रेडिओ & टीव्ही/ रेफ्रिजरेषण
आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक/ ट्रॅक्टर मेकॅनिक/ टर्नर) इत्यादींचा समावेश आहे किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा जसे की ( मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल) असणे आवश्यक आहे.
या भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा
या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक व पात्र असतील त्यांचे वय एक ऑगस्ट 2024 दरम्यान किमान 18 ते 39 असणे गरजेचे आहे. एससी आणि एसटी उमेदवारांना वयात पाच वर्ष तर ओबीसी उमेदवारांना तीन वर्षे सूट देण्यात आलेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी जे उमेदवार पात्र आणि इच्छुक असतील ते उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत व अर्जाची प्रक्रिया 16 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणार आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 ऑक्टोबर 2024 पर्यंत असणार आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना किती मिळेल पगार?
या भरतीमध्ये अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना पदनिहाय दरमहा अठरा हजार ते 44 हजार 900 रुपयांपर्यंत पगार येणार आहे.
या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी
konkanrailway.com या संकेतस्थळावर क्लिक करून अधिकची माहिती घेता येईल.