Job News:- अनेक तरुण-तरुणी परीक्षांची तयारी करतात व त्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत असतात. अशा विद्यार्थ्यांसाठी सध्या अनेक शासकीय विभागाअंतर्गत भरती प्रक्रिया राबवल्या जात असून त्याशिवाय रेल्वे विभाग, बँकिंग सारख्या क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणावर भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहेत.
त्यामुळे अशाप्रकारे भरतीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींसाठी हा कालावधी खूप महत्त्वाचा आहे. या अनुषंगाने जर आपण प्राध्यापक या पदासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या दृष्टिकोनातून बघितले तर त्यांच्यासाठी देखील एक सुवर्णसंधी चालून आली असून
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना येथे प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या रिक्त जागांकरिता भरती जाहीर करण्यात आलेली असून जे इच्छुक व पात्र उमेदवार असतील त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना येथे सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांसाठी भरती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना या अंतर्गत प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा भरण्याकरिता भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली असून या भरतीसाठी जे उमेदवार पात्र आणि इच्छुक असतील त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत.
किती आहेत रिक्त पदे?
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना येथे सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक या पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून एकूण रिक्त पदसंख्या ही 44 इतकी आहे.
पदनिहाय रिक्त जागा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेकरिता प्राध्यापक या पदासाठीच्या 17 जागा रिक्त असून सहयोग प्राध्यापक या पदाच्या 27 जागा रिक्त आहेत. अशा एकूण 44 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत
या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करायचा असेल तर त्यांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवणार?
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना अंतर्गत प्राध्यापक आणि सहयोग प्राध्यापक या पदांच्या रिक्त जागांसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून हे अर्ज
अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना जिल्हा सामान्य रुग्णालय आवार, बायपास रोड, समर्थ नगर जालना, पिन 431213 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
काय आहे अर्ज करण्याचा शेवटची तारीख?
राबवण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑगस्ट 2024 आहे.
निवड झालेल्या उमेदवारांचे नोकरीचे ठिकाण
या अंतर्गत ज्या उमेदवारांची निवड केली जाईल त्यांचे नोकरीचे ठिकाण हे जालना असणार आहे.
अर्ज करताना ही काळजी घ्या
या भरती करता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर आपल्या पद्धतीने अर्ज करायचा आहे. परंतु त्या अगोदर उमेदवारांनी या भरतीचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे व ऑफलाइन पद्धतीने अर्ज नऊ ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावे.
अधिकृत वेबसाईट
https://jalna.gov.in/en/ हे असून यावर तुम्ही त्याची माहिती घेऊ शकतात.