माजी सैनिकांसाठी आनंदाची बातमी : ‘ही’ पदवी मिळण्याची संधी !

Published on -

माजी सैनिकांना आंध्र विद्यापीठाकडून कला शाखा पदवी प्राप्त करून घेण्याची संधी आहे. यासाठी माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कार्यालयास संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

केंद्रीय सैनिक बोर्ड व आंध्र विद्यापीठ यांच्यात कला शाखेतून BA (HRM) पदवी प्रमाणपत्र प्राप्त करून देण्यासाठी करार झालेला आहे. हे पदवी प्रमाणपत्र केंद्र व राज्य सरकार तसेच इतर सार्वजनिक उपक्रमाच्या नोकरीसाठी मान्यताप्राप्त आहे. देशाच्या रक्षणासाठी आपल्या तरुणाईच्या आयुष्याचा मोठा भाग समर्पित करणाऱ्या सैनिकांना नोकरीसाठी शैक्षणिक क्षेत्रात सशक्त बनवणे हा उद्देश आहे.

यासाठी माजी सैनिकांने इयत्ता बारावी किंवा समतुल्य शिक्षण किंवा भारतीय आर्मी, नेव्ही, एअरफोर्स व्दारा प्राप्त शिक्षणाचे विशेष प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. माजी सैनिकांची सेवा पंधरा वर्षापेक्षा कमी नसावी.

दिनांक १ जानेवारी २०१० नंतर निवृत्त झालेला असावा. माजी सैनिक इयत्ता दहावी पास असेल तर अशा उमेदवाराना ५ वर्षाचा अभ्यासक्रम (२ वर्ष १२ वी + ३ वर्ष पदवी) लागू राहील. सदर अभ्यासक्रमाचे शुल्क १२५०० रूपये असून अर्जदाराने आपले अर्ज फक्त एप्रिल किंवा ऑक्टोबर महिन्यातच संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावेत.

अधिक माहीतीसाठी www.ksb.gov.in या संकेतस्थळी भेट दऊन circulars / publications पहावे किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास भेट द्यावी.असे आवाहन ही या प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News