Mumbai Railway News : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी मुंबई हुन गुजरात आणि राजस्थानला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक आनंदाची ठरणार आहे. कारण की मुंबई येथील वांद्रे टर्मिनस वरून राजस्थानमधील अजमेर पर्यंत नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. दरम्यान आज आपण वांद्रे टर्मिनस – अजमेर विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक तसेच ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार याचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस राहणार वांद्रे टर्मिनस ते अजमेर विशेष एक्सप्रेसचे वेळापत्रक
मिळालेल्या माहितीनुसार, अजमेर – वांद्रे टर्मिनस विशेष एक्सप्रेस ट्रेन 13 जुलै ते सात सप्टेंबर 2025 या काळात चालवली जाणार आहे. या काळात गाडी क्रमांक 09621 अजमेर रेल्वे स्थानकावरून दर रविवारी सकाळी सहा वाजून 35 मिनिटांनी सोडले जाणार आहे आणि सोमवारी चार वाजून पंधरा मिनिटांनी ही गाडी वांद्रे टर्मिनस येथे पोहोचणार आहे. तसेच वांद्रे टर्मिनस – अजमेर विशेष एक्सप्रेस ट्रेन 14 जुलै ते 8 सप्टेंबर 2025 या काळात चालवली जाणार आहे. या काळात गाडी क्रमांक 09622 ही विशेष गाडी वांद्रे टर्मिनस येथून दर सोमवारी सकाळी नऊ वाजून 35 मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि रविवारी आठ वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी अजमेर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.

कोण कोणत्या स्थानकावर थांबा घेणार
मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे टर्मिनस ते अजमेर दरम्यान चालवल्या जाणाऱ्या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आलेला आहे. ही गाडी राजस्थान मधील अजमेर मधून सुटल्यानंतर किशनगड, जयपूर, सवाईमाधोपूर, कोटा, रामगंजमंडी, भवानीमंडी, विक्रमगड अलोट, रतलाम, वडोदरा, सुरत, वलसाड, वापी आणि बोरिवली या रेल्वे स्टेशनवर थांबा घेत वांद्रे टर्मिनस येथे पोहोचणार आहे. खरे तर मुंबई येथे गुजरात आणि राजस्थान मधील बहुतांशी लोक कामानिमित्ताने स्थायिक झालेले आहेत. गुजरात आणि राजस्थान मधील जनता राजधानी मुंबईत उद्योगासाठी आणि नोकरीसाठी स्थायिक झाली आहे आणि ही विशेष गाडी याच नागरिकांसाठी अधिक फायद्याची राहणार आहे.