मुंबई, पुणे आणि कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी Good News ! गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वे कडून 11 विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा, रूट पहा..

मुंबई आणि पुण्यातून कोकणात जाणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. विशेषता गणेशोत्सवाच्या काळात ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या माध्यमातून मुंबई आणि पुण्यातून कोकण रेल्वे मार्गावर अकरा विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे.

Published on -

Maharashtra Railway : गणेशोत्सवाच्या काळात आपल्या मूळ गावाला जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे कडून मुंबई आणि पुण्यातून काही विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना या विशेष गाड्यांचा मोठा फायदा होणार आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात मुंबई आणि पुण्यातून कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या फारच उल्लेखनीय असते. यंदाही मुंबई आणि पुण्यातून हजारो नागरिक कोकणात जाणार आहेत.

दरम्यान याच चाकरमान्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून मुंबई आणि पुणे येथून कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे कोकण रेल्वे मार्गावर 11 विशेष गाड्या चालवणार आहे.

कुठून कुठपर्यंत धावणार विशेष गाड्या ?

मध्य रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, सीएसएमटी – सावंतवाडी – सीएसएमटी यादरम्यान गाडी क्रमांक 01151/52 ही विशेष गाडी दररोज चालवली जाणार आहे. सीएसएमटी ते रत्नागिरी दरम्यान गाडी क्रमांक 01153 / 54 ही विशेष गाडी दररोज चालवली जाणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी दरम्यान गाडी क्रमांक 01167/68 ही विशेष गाडी दररोज चालवली जाणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी दरम्यान गाडी क्रमांक 01171/72 ही गाडी दररोज चालवली जाणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव दरम्यान गाडी क्रमांक 01185 / 86 ही विशेष गाडी आठवड्यातून एक दिवस चालवली जाणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव दरम्यान गाडी क्रमांक 01165 / 66 ही विशेष गाडी आठवड्यातून एक दिवस चालवली जाणार आहे. पुणे – रत्नागिरी – पुणे यादरम्यान गाडी क्रमांक 01447 / 48 ही साप्ताहिक विशेष गाडी चालवली जाणार आहे. पुणे – रत्नागिरी – पुणे दरम्यान गाडी क्रमांक 01445 / 46 ही साप्ताहिक विशेष गाडी चालवली जाणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान गाडी क्रमांक 01103/04 ही विशेष एक्सप्रेस ट्रेन दररोज चालवली जाणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी यादरम्यान गाडी क्रमांक 01129/30 ही साप्ताहिक विशेष गाडी चालवली जाणार आहे. दिवा – चिपळूण – दिवा दरम्यान गाडी क्रमांक 01155 / 56 हे विशेष गाडी दररोज चालवली जाणार आहे. दरम्यान या विशेष गाड्यांचे आरक्षण लवकरच खुले होणार असल्याची माहिती देखील एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!