अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :-कोरोना आजाराने सर्व जगभर धुमाकूळ घातला आहे. जगभरातील संशोधक लस शोधण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
आता रशियाने यावरील पहिलील्स शोधली असून मानवी चाचण्या यशस्वी झाल्यानंतर रशियाने आता ही लस बाजारात आणण्याचे जाहीर केले आहे.
लस ऑगस्ट महिन्यात बाजारात येणार असून रशिया प्रायोगिक तत्वावर 3 कोटी कोरोना लसीची निर्मिती करणार आहे. यातील जवळपास 1 कोटी 70 लाख लस विदेशात निर्माण केल्या जाऊ शकतात.
सेचनोक युनिव्हर्सिटीच्या इंस्टीटय़ूट ऑफ मेडिकल पैरासिटोलॉजी, ट्रॉपिकल अँड वेक्टर-बॉर्न डिसीजचे निदेशक अलेक्जेंडर लुवाशेक यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनावरील नव्या लसीच्या सर्व मानवी चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.
शिवाय लसीच्या सुरक्षिततेबाबतही आम्ही पूर्ण पडताळणी केली आहे. 12 ते 14 ऑगस्ट दरम्यान ही लस लॉन्च केली जाईल आणि रुग्णांना देण्यात येईल असेही त्यांनी सांगितलं.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]