Government Employee News : महाराष्ट्र राज्य शासनात महामंडळ अंतर्गत लाखों कर्मचारी कार्यरत आहेत. एसटी महामंडळात देखील लाखोंच्या संख्येने राज्य कर्मचारी कार्यरत आहेत. महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या अनेक अडचणी देखील आहेत. यासाठी गेल्या काही महिन्यांपूर्वी कर्मचाऱ्यांनी मोठं आंदोलन उभारलं होतं.
त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या आणि आंदोलन शिथिल झालं. मध्यंतरी या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली. दरम्यान आता त्यांच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे ऑक्टोबर महिन्यातील थकीत पेमेंट संदर्भात. खरं पाहता एसटी महामंडळातील लाखो कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्यातील पेमेंट थकले आहे.
यामुळे एसटी कर्मचाऱ्यांकडून गेल्या काही दिवसांपासून वारंवार पेमेंट संदर्भात विचारना केली जात आहे. त्यामुळेच आता महाराष्ट्र राज्य शासनाने ऑक्टोबर महिन्यातील थकीत पेमेंट एसटी कर्मचाऱ्यांना देऊ करण्यासाठी 200 कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने मंजूर केलेली ही रक्कम अपुरी असून यासाठी 360 कोटी रुपयांची रक्कम दर महिन्याला द्यायला हवेत अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून केली जात आहे.
खरं पाहता ऑक्टोबरचे पेमेंट आणि मागील थकबाकी यासाठी एसटी महामंडळाने 790 कोटी रुपयांची मागणी केली होती. परंतु प्रत्यक्षात मात्र केवळ 200 कोटी रुपये एवढीच रक्कम महामंडळाकडे आले आहेत. अशा परिस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन देणे अशक्य होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे पूर्ण पगाराची तजवीज करावी लागेल असे महामंडळाने म्हटले आहे. खरं पाहता, एसटी कर्मचाऱ्यांनी जो काही संप घडवून आणला किंवा आंदोलन केलं होतं.
त्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने वेतनाची पूर्ण रक्कम दरमहा सरकारकडून दिले जाईल असं आश्वासन आणि हमी दिली होती. विशेष म्हणजे सदर आश्वासन न्यायालयात देण्यात आलं. त्यानंतर केवळ दोन महिने सरकारने योग्य पद्धतीने एसटी महामंडळाला निधी दिली. पण शिंदे फडणवीस सरकारच्या काळात एकदाही एसटी महामंडळाला पूर्ण निधी वितरित करण्यात आलेला नाही. त्यामुळे न्यायालयात दिलेले आश्वासन धुळीस मिळालेले पाहायला मिळत आहे.