Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की, नुकत्याच काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली आहे.
म्हणजेच सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता अर्थातच डीए 42 टक्के दराने मिळत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना ही महागाई भत्ता वाढ जानेवारी महिन्यापासून लागू झाली आहे.

दरम्यान आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाणार आहे. डीए मध्ये आणखी चार टक्के वाढ होणार आहे. जुलै महिन्यापासून ही वाढ लागू केली जाणार आहे.
हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! आता नासिकमधून ‘या’ शहरादरम्यान सुरू होणार किमान सेवा, प्रवाशांचा प्रवास होणार सुसाट
म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून 46 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. निश्चितच केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे.
यासोबतच केंद्रशासनाप्रमाणेच महाराष्ट्र राज्य शासन देखील राज्यात शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट देणार आहे. राज्य शासन लवकरच राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ देणार आहे.
येत्या काही दिवसात State Employee ला चार टक्के महागाई भत्ता वाढ लागू केली जाणार आहे. जानेवारी महिन्यापासून ही वाढ लागू केली जाईल. अर्थातच राज्य कर्मचाऱ्यांना थकबाकी देखील मिळणार आहे.
हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! ‘या’ बँकेत निघाली मोठी भरती, पगार मिळणार तब्बल 89 हजार, पहा डिटेल्स
दरम्यान काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये याबाबतचा सविस्तर प्रस्ताव वित्त विभागाने तयार केला असून लवकरच याला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळेल असं सांगितलं जात आहे.
यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांना नेमका महागाई भत्ता वाढीचा लाभ केव्हा मिळतो याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. वास्तविक, आज सुप्रीम कोर्टात सत्ता संघर्षावर सुनावणी झाली आहे. यामध्ये, सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या पात्रतेच प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवल आहे.
यामुळे शिंदे-फडणवीस सरकार राज्यात कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आता हे सरकार लवकरच कर्मचाऱ्यांच्या डीएवाढीबाबत निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हे पण वाचा :- रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ! अकोला मार्गे धावणारी ‘ही’ सुपरफास्ट ट्रेन सुरु झाली, पहा संपूर्ण वेळापत्रक