Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी समोर आली आहे सांस्कृतिक राजधानी पुणे येथून. खरं पाहता, प्रादेशिक परिवहन कार्यालयाने म्हणजेच आरटीओने शहरात बेशिस्त वाहतूकदारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दुचाकीस्वार यांना आरटीओच्या माध्यमातून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे.
जे कोणी दुचाकीस्वार विना हेल्मेट दुचाकीवर प्रवास करतील त्यांच्याकडून मोठी फाईन घेतली जात आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्य जनतेसोबतच आता सरकारी कर्मचाऱ्यांवर देखील मोठी कारवाई आरटीओच्या माध्यमातून केली जात आहे. विशेष म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यावर त्यांच्या कार्यालयात जाऊन कार्यवाही होत आहे. यामुळे जे दुचाकीस्वार सरकारी कर्मचारी विना हेल्मेट प्रवास करणार आहेत त्यांना देखील मोठा दंड द्यावा लागणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आरटीओने गेल्या काही दिवसांपासून दुचाकीस्वारास पुणे शहरात प्रवास करण्यासाठी हेल्मेटची सक्ती केली आहे. यासाठी आरटीओच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यालयात जाऊनही जनजागृती केली आहे. आता जनजागृतीनंतर प्रत्यक्ष आरटीओच्या माध्यमातून कार्यवाही केली जात आहे.
जनजागृती केल्यानंतरही जे सरकारी कर्मचारी बेशिस्त वागत असतील आणि दुचाकीवर हेल्मेट घालून प्रवास करत नसतील अशा सरकारी कर्मचाऱ्यांकडून आता दंड म्हणून पाचशे रुपये वसूल केले जात आहेत. याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, नियम न पाळणाऱ्या सर्वसामान्य जनतेवर त्यांनी रस्त्यांवर कारवाई सुरु केली आहे.
पण बेसिस्त, नियमभंग करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवरही देखील त्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा नियमभंग करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर त्यांच्या कार्यालयात जाऊन कारवाई केली जात असल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे. शिंदे म्हणतात कि, सरकारी कर्मचारी या नात्याने त्यांनी अधिक जबाबदारीने वागले पाहिजे.
दुचाकी चालवताना हेल्मेट घालून न केवळ ते स्वत:च्या जिवाची काळजी घेत आहेत, तर ते सुरक्षेबाबत एक चांगला संदेशही देण्याचे काम करणार आहेत. एकंदरीत आता पुणे शहरात नोकरी करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट परिधान करूनच दुचाकीवरून प्रवास करावा लागणार आहे.
हे पण वाचा :- पुणे रिंगरोडबाबत मोठी बातमी; मे महिन्यात होणार ‘हे’ महत्वाचं काम, पहा….
जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याने विना हेल्मेट दुचाकीवर प्रवास केला तर अशा कर्मचाऱ्याकडून त्याच्या कार्यालयात जाऊन पाचशे रुपयांचा दंड आरटीओच्या माध्यमातून आकारला जाणार आहे. एकंदरीत आरटीओची ही मोहीम सरकारी कर्मचाऱ्यांच्या खिशाला झळ देणारी असली तरी देखील सरकारी कर्मचाऱ्यांना यामुळे वचक बसेल अन ते आपल्या आणि इतर प्रवाशांचा जीव या निमित्ताने धोक्यात घालणार नाहीत, तसेच हेल्मेट परिधान करूनच दुचाकीवरून प्रवास करतील. शिवाय, यामुळे इतर प्रवाशांना देखील एक मोठा मेसेज जाणार आहे. वास्तविक ही देखील एक मोठी जनजागृती राहणार आहे, त्यामुळे पुणे आरटीओ यासाठी अभिनंदनपात्र आहे एवढं नक्की.
हे पण वाचा :- अहमदनगरच्या शेतकऱ्याचा नवीन प्रयोग ! चक्क पिवळ्या कलिंगडची केली लागवड, कमवलेत लाखों; पहा ही यशोगाथा