सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ कामासाठी मिळाली 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत

केंद्रातील सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भातील आहे. म्हणून आता आपण सरकारच्या या निर्णयाची तपशीलवार माहिती पाहणार आहोत.

Published on -

Government Employee News : देशभरातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. केंद्रातील सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

जसं की आपणास ठाऊकच आहे की केंद्रातील सरकारने नवीन पेन्शन योजना म्हणजेच एनपीएस लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

मात्र युनिफाईड पेन्शन स्कीम ही फक्त एनपीएस योजना लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच लागू केली जाणार आहे आणि ही एक ऐच्छिक योजना राहणार आहे म्हणजेच एक कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीम किंवा सध्याची नवीन पेन्शन स्कीम यापैकी कोणतीही एक योजना निवडता येणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, युनिफाईड पेन्शनच स्वरूप अगदीच जुन्या पेन्शन योजनेच्या प्रमाणे आहे. दरम्यान आता याच युनिफाईड पेन्शन स्कीमच्या संदर्भात एक नवी अपडेट हाती आली आहे.

काय आहे नवीन अपडेट 

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन पेन्शन योजना लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता एनपीएस म्हणजे नवीन पेन्शन योजना किंवा यूपीएस म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम निवडण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना या दोन्हीपैकी कोणतीही एक योजना निवडण्यासाठी आधी 30 जून 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र आता ही मुदत पुन्हा एकदा तीन महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रातील सरकारकडून एक एप्रिल 2025 पासून युनिफाईड पेन्शन स्कीम साठी अर्ज स्वीकारले जात होते. सरकारकडून 30 जून पर्यंत यासाठी अर्ज स्वीकारले जाणार होते.

मात्र यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांकडून मुदतवाढ मिळायला हवी अशी मागणी करण्यात आली. यानुसार सरकारने आता युनिफाईड पेन्शन स्कीम साठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

या तारखेपर्यंत अर्ज करता येणार 

मिळालेल्या माहितीनुसार, युनिफाईड पेन्शन स्कीम साठी अर्ज करणे हेतू आता तीन महिन्यांची मुदत वाढ मिळाली आहे. म्हणजेच 30 सप्टेंबर 2025 पर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना एनपीएस किंवा यूपीएस यापैकी कोणत्याही एका योजनेचा पर्याय सिलेक्ट करता येणार आहे.

सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार सरकारने ही मुदतवाढ दिलेली आहे. महत्त्वाची बाब अशी की यासाठीचे अधिकृत प्रेस नोट देखील केंद्रातील सरकारकडून नुकतेच जारी करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!