आनंदाची बातमी ! पावरग्रीड कॉर्पोरेशन मध्ये ‘या’ पदाची भरती सुरू, आजच करा अर्ज

Government Job : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेत विविध रिक्त पदांसाठी भरती आयोजित झाली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अधिनस्त कामकाज पाहत असते.

आता या संस्थेत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात काढण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार एचआर विभागात कनिष्ठ अधिकारी या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4% वाढला; आता केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणार 42 टक्के DA, वाचा सविस्तर

त्यासाठी इच्छुक उमेदवारांना लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज ऑनलाइन खर्च करावा लागणार आहे. दरम्यान आज आपण या पदभारती संदर्भात सर्व आवश्यक माहिती थोडक्यात पण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या अन किती रिक्त पदांसाठी होणार आहे भरती?

एचआर विभागात कनिष्ठ अधिकारी या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदाच्या 48 रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! आता शहरात वंदे भारतच्या धर्तीवर ‘या’ लोकल ट्रेन सुरु होणार, रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाली, कसा असणार प्रकल्प?

पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता?

या पदासाठी किमान ६०% गुणांसह BBA/ BBM/ BBS किंवा मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पुर्ण केलेले उमेदवार पात्र राहणार आहेत.

वयोमर्यादा

या पदासाठी 18 ते 27 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र राहतील.

किती पगार मिळणार?

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 27 हजार 500 रुपये प्रति महिना इतक वेतन मिळणार आहे.

हे पण वाचा :- मुंबई, पुणेकरांसाठी आनंदी बातमी ! ‘या’ मार्गांवर इलेक्ट्रिक शिवनेरी बस सूरू, संपूर्ण वेळापत्रक आणि तिकीट दर, पहा….

अर्ज कसा करावा लागणार?

या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. careers.powergrid.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक व्यक्ती आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतील.

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक

अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार या पदासाठी इच्छुक आणि पात्र व्यक्तींना आपला अर्ज 30 मे 2023 पर्यंत सादर करता येणार आहे. विहित कालावधीनंतर या पदासाठी अर्ज सादर करता येणार नाही याची नोंद मात्र इच्छुक उमेदवारांना घ्यायची आहे. 

हे पण वाचा :- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘ही’ बंद झालेली एक्सप्रेस ट्रेन पुन्हा होणार सुरू, केव्हा धावणार? पहा….