अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी सध्या बाजारपेठेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर धमाल केली असून वेगवेगळ्या कंपन्यांनी कमीत कमी किमतीत आकर्षक असे फीचर्स असलेले स्मार्टफोन सध्या लॉन्च केलेले आहेत व येणाऱ्या काही दिवसांमध्ये अनेक कंपन्यांच्या माध्यमातून धमाकेदार असे स्मार्टफोन लॉन्च केले जाणार आहेत.
त्यामुळे सणासुदीच्या या कालावधीमध्ये तुम्हाला देखील बजेटमध्ये व चांगला फीचर्स असलेला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही 29 ऑगस्टपर्यंत वाट पाहणे गरजेचे आहे. कारण 29 ऑगस्टला चिनी टेक कंपनी रियलमी ही कंपनी रियलमी 13 5G सिरीज स्मार्टफोन लॉन्च करणार आहे व या सिरीज अंतर्गत ही कंपनी दोन स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
याबद्दल माहिती देणारा टीझर कंपनीच्या माध्यमातून जारी करण्यात आलेला आहे. त्यानुसार या स्मार्टफोन बद्दल आपल्याला बरीच माहिती मिळण्यास मदत झालेली आहे. रियलमी कंपनीच्या माध्यमातून लॉन्च करण्यात येत असलेल्या रियलमी 13 सिरीज अंतर्गत जे स्मार्टफोन लॉन्च केले जाणार आहेत
त्यातील पहिला म्हणजे रियलमी 13 5G आणि रियलमी 13+ 5G असे दोन स्मार्टफोन लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे. तसं पाहायला गेलं तर कंपनीच्या माध्यमातून या दोन्ही स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन कोणते आहेत याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.
परंतु अनेक मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून या स्मार्टफोनच्या संदर्भात अनेक प्रकारची माहिती समोर आलेली आहे. त्यानुसार आपण या स्मार्टफोनचे फीचर्स जाणून घेऊ.
असे असू शकतात रियलमी 13 5G आणि रियलमी 13+ 5G स्मार्टफोनचे फीचर्स
1- असा राहू शकतो डिस्प्ले– रियलमी 13 5G या स्मार्टफोनमध्ये 6.72 इंच एलटीपीएस डिस्प्ले कंपनीच्या माध्यमातून दिला जाऊ शकतो व जो फुल HD+ ला सपोर्ट करतो व रियलमी 13+ 5G स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल HD+AMOLED डिस्प्ले असू शकतो.
2- कसा राहू शकतो कॅमेरा सेटअप?- कंपनीच्या माध्यमातून उत्तम फोटोग्राफी आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करिता या सिरीज अंतर्गत दोन्ही स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असण्याची शक्यता असून दोन्ही फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल.
परंतु याबद्दलची माहिती अजून पर्यंत समोर आलेली नाही. तसेच उत्तम सेल्फी व व्हिडिओ कॉलिंग करिता रियलमी 13 5G स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आणि रियलमी 13+ 5G स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे.
3- अशी राहू शकते बॅटरी आणि चार्जिंग– उत्तम पावर बॅकअप करिता कंपनीच्या माध्यमातून या दोन्ही प्रकारच्या स्मार्टफोनमध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 4880mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे.
तसेच रियलमी कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर याबद्दल माहिती देताना म्हटले आहे की, या दोन्ही प्रकारच्या स्मार्टफोनच्या पाच मिनिटाच्या चार्जिंग नंतर वापरकर्ते एक तासासाठी गेम्स खेळू शकतात.
किती राहिल रियलमी 13 सिरीजची किंमत?
जर आपण मीडिया रिपोर्ट्समध्ये मिळालेल्या माहितीनुसार बघितले तर रियलमी कंपनी रियलमी 13 सिरीज वीस हजार रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करू शकते व साधारणपणे चार प्रकारांमध्ये हे दोन्ही स्मार्टफोन लॉन्च होतील अशी एक शक्यता आहे.