पदवीधर तरुणांसाठी सुवर्णसंधी! केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत ‘या’ पदासाठी निघाली भरती, पहा डिटेल्स

Graduate Government Job : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर येथे पदवीधर तनुणांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. या संस्थेत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी नुकतीच अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे.

या अधिसूचनेनुसार केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत रिक्त पदांच्या जागा थेट मुलाखतीने भरल्या जाणार आहेत. अर्थातच या पदभरतीमध्ये उमेदवाराची निवड थेट मुलाखत घेऊन केली जाणार आहे. यासाठी कोणतीच लेखी परीक्षा आयोजित होणार नसल्याचे समोर आले आहे.

अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती जसे की, कोणत्या रिक्त पदांसाठी होणार भरती, किती रिक्त पदांसाठी होणार भरती, यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक यांसारख्या सर्वच बाबीची थोडक्यात पण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

हे पण वाचा :- सावधान ! अवकाळी परत येतोय; ‘या’ भागात पुढील 3 दिवस कोसळणार वादळी पाऊस, तुमच्या भागात कसं राहणार हवामान?

कोणत्या रिक्त पदांसाठी होणार भरती?

केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर येथे वरिष्ठ सल्लागार, संशोधन सहयोगी आणि यंग प्रोफेशनल या पदाच्या रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

किती जागांसाठी होणार भरती?

वरिष्ठ सल्लागार या पदाची एक रिक्त जागा भरली जाणार आहे.

संशोधन सहयोगी या पदाच्या दोन रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

यंग प्रोफेशनल या पदाच्या नऊ रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

म्हणजेच एकूण 12 रिक्त जागांसाठी ही भरती आयोजित केली जाणार आहे.

हे पण वाचा :- विद्यार्थ्यांनो तयारीला लागा ! अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला ‘या’ दिवशी होणार सुरुवात, पहा…

आवश्यक शैक्षणिक पात्रता?

वरिष्ठ सल्लागार :- अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, या पदासाठी ICAR/SAUS मधील सेवानिवृत्त अधिकारी पात्र राहणार आहेत. तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी विषयात डॉक्टरेट पदवी घेतलेले उमेदवार यासाठी पात्र राहणार आहेत. सोबतच, 20 वर्षांचा कामाचा अनुभव असलेले उमेदवार यासाठी पात्र राहतील.

संशोधन सहयोगी :- या पदासाठी कृषी विषयात पीएचडी किंवा कृषी विषयात पदव्युत्तर पदवी घेतलेले उमेदवार यासाठी पात्र राहणार आहेत.

यंग प्रोफेशनल :- या पदासाठी संगणक अनुप्रयोग/माहिती/संगणक तंत्रज्ञान/संगणक विज्ञान/कृत्रिम बुद्धिमत्ता/ऑपरेटिंग सिस्टीम/सॉफ्टवेअर अभियांत्रिकी/संगणक ग्राफिक्समध्ये किमान 60% गुणांसह पदवी किंवा एमसीए पदवी प्राप्त उमेदवार यासाठी पात्र राहणार आहेत.

वयोमर्यादा 

या पदासाठी 21 ते 65 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत. तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना तीन ते पाच वर्षांची नियमानुसार सूट देखील दिली जाणार आहे.

मुलाखत केव्हा आणि कुठे होणार?

यासाठी 25 मे 2023 रोजी ICAR – इंस्टिट्यूट ऑफ सेंट्रल कॉटन रिसर्च सेंटर, हिंदुस्थान एलपीजी डेपोजवळ, पांजरी, वर्धा रोड, नागपूर या ठिकाणी मुलाखत आयोजित होणार आहे.

हे पण वाचा :- ब्रेकिंग ! सिकंदराबाद-कोल्हापूर रेल्वे गाडीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर; या गाडीला कुठे राहणार थांबे? पहा…..