जानेवारी ते मार्च 2025 दरम्यान देशातील हवामान कस राहणार ? पाऊसमान कसे राहील?

भारतीय हवामान खात्यातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे जानेवारीमध्ये देशातील अनेक भागांमधील किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहणार आणि यामुळे या महिन्यात कडाक्याची थंडी जाणवणार नाही. पण राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये काही भागात कडाक्याची थंडी पडू शकते असेही आयएमडीच्या तज्ञांकडून सांगितले गेले आहे. जानेवारी 2025 मध्ये वायव्य भारताचा पूर्व भाग, मध्य भारताचा उत्तर भाग आणि पूर्व भारताचा काही भाग वगळता देशातील बहुतांशी भागात थंडी कमी राहणार असे हवामान खात्याने जाहीर केले आहे.

Tejas B Shelar
Published:
Havaman Andaj 2025

Havaman Andaj 2025 : भारतीय हवामान खात्याने नववर्षातील पहिल्या तीन महिन्यांचा हवामान अंदाज जारी केला आहे. या पहिल्या तीन महिन्यांमध्ये भारतात सरासरी इतका पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जानेवारी ते मार्च 2025 या कालावधीत 88 ते 112 टक्के एवढा पाऊस पडणार असे हवामान खात्याने आपल्या नव्या अंदाजात म्हटले आहे.

महत्त्वाचे म्हणजे जानेवारी महिन्यात थंडीचे प्रमाणही कमी राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्यातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे जानेवारीमध्ये देशातील अनेक भागांमधील किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहणार आणि यामुळे या महिन्यात कडाक्याची थंडी जाणवणार नाही.

पण राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये काही भागात कडाक्याची थंडी पडू शकते असेही आयएमडीच्या तज्ञांकडून सांगितले गेले आहे. जानेवारी 2025 मध्ये वायव्य भारताचा पूर्व भाग, मध्य भारताचा उत्तर भाग आणि पूर्व भारताचा काही भाग वगळता देशातील बहुतांशी भागात थंडी कमी राहणार असे हवामान खात्याने जाहीर केले आहे.

देशाच्या बहुतांश भागांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील आणि यामुळे थंडीचे प्रमाण कमी राहणार असा अंदाज आहे. मंडळी डिसेंबर 2024 च्या सुरुवातीला देशातील अनेक भागांमध्ये किमान तापमान कमी झाले होते आणि यामुळे थंडीचा जोर वाढला होता.

महाराष्ट्रातही डिसेंबर महिन्यात हंगामातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली आणि राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांशी भागांमध्ये थंडीचा जोर वाढला. उत्तर महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण डिसेंबर महिन्यात सर्वाधिक होते.

या थंडीचा रब्बी हंगामातील पिकांना फायदा सुद्धा झाला होता. मात्र नंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा झाला आणि त्यानंतर देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि याचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रावरही पाहायला मिळाला.

देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि याचा प्रभाव म्हणून आपल्या महाराष्ट्रात देखील ढगाळ हवामान आणि पावसाळी वातावरण तयार झाले. राज्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. या पावसामुळे आणि ढगाळ हवामामुळे राज्यातील थंडीचा जोर कमी झाला.

डिसेंबर अखेरपर्यंत राज्यातील थंडीचा जोर हा कमीच राहिला. आता जानेवारी महिन्यात थंडीचे तीव्रता वाढेल असे म्हटले जात होते. मात्र भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाज आज जानेवारी 2025 मध्ये थंडीचे प्रमाण सरासरी पेक्षा कमी राहू शकते असे दिसते.

जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या काळात देशात सरासरी एवढा पाऊस पडणार आहे. या काळात दरवर्षी 69.7 मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. या काळात उत्तर भारताकडे पावसाचे प्रमाण अधिक राहते. यंदाही उत्तर भारतात या काळात सरासरी एवढा पाऊस पडणार असे दिसते तसेच महाराष्ट्रात देखील या काळात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज यावेळी देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe