हिरोने धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर आणली शुभ मुहूर्त ऑफर! 1999 रुपयांच्या ईएमआयवर घरी घेऊन जा 70 किमी मायलेज देणारी ही बाईक

हिरो मोटो कॉर्प ही एक प्रसिद्ध असलेली बाईक उत्पादक कंपनी असून या कंपनीने धनत्रयोदशीच्या निमित्ताने शुभ मुहूर्त ऑफर आणली असून या ऑफर अंतर्गत या महिन्यात तुम्ही हिरोची एचएफ डीलक्स बाईक खरेदी केली तर त्या खरेदीवर तुम्हाला साडेपाच हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट मिळणार आहे.

Ajay Patil
Published:
hero hf deluxe

Hero HF Deluxe Bike:-दिवाळी सणाच्या मुहूर्तावर आता अनेक वाहन उत्पादक कंपन्या जसे की कार आणि बाईक उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करण्याकरिता अनेक उत्तम पद्धतीच्या ऑफर्स जारी करण्यात आलेल्या असून या ऑफर्स अंतर्गत अनेक वाहनांच्या चांगल्या मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणावर सूट दिली जात आहे.

यामुळे ग्राहकांना देखील वाहन खरेदीवर मोठ्या प्रमाणावर पैशांची बचत करता येणे शक्य झालेले आहे. अगदी याच पद्धतीने तुम्हाला देखील या दिवाळीत चांगले वैशिष्ट्य असणारी व उत्तम मायलेज देणारी बाईक खरेदी करायची असेल

तर तुम्ही हिरो मोटो कॉर्पच्या धनत्रयोदशी निमित्त आणलेल्या शुभ मुहूर्त ऑफर अंतर्गत हिरो मोटोकॉर्प ची एचएफ डीलक्स बाईक स्वस्तामध्ये खरेदी करू शकतात. उत्तम मायलेज देणारी बाईक असून यामध्ये उत्तम फीचर्स देखील देण्यात आलेले आहेत.

 काय आहे हिरोच्या एचएफ डीलक्सवर ऑफर?

हिरो मोटो कॉर्प ही एक प्रसिद्ध असलेली बाईक उत्पादक कंपनी असून या कंपनीने धनत्रयोदशीच्या निमित्ताने शुभ मुहूर्त ऑफर आणली असून या ऑफर अंतर्गत या महिन्यात तुम्ही हिरोची एचएफ डीलक्स बाईक खरेदी केली तर त्या खरेदीवर तुम्हाला साडेपाच हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट मिळणार आहे.

इतकेच नाही तर तुम्ही या बाईकवर किमान 1999 चा ईएमआय चा पर्याय देखील दिला जाणार आहे. त्यासोबतच या बाईक खरेदीवर पाच हजारांचा कॅशबॅक देखील मिळणार आहे. या ऑफर्सबद्दल तुम्ही हिरो मोटोकॉर्पच्या शोरूममध्ये जाऊन अधिकची माहिती घेऊ शकतात.

 काय आहे या बाईकमध्ये विशेष?

एचएफ डीलक्स मध्ये फ्युएल इंजेक्शन टेक्नॉलॉजी असलेले 97.2 सीसी इंजिन देण्यात आले असून इंजिन 8.36 पीएस पावर आणि 8.05 एनएम टॉर्क जनरेट करते.

तसेच या इंजिनला चार स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला असून शहरात आणि हायवेवर खूप चांगल्या परफॉर्मन्ससाठी ही बाईक ओळखली जाते. एचएफ डीलक्स मध्ये मेटल ग्रॅब रेल, ब्लॅक थीम बेस्ड एक्झॉस्ट, क्लेश गार्ड तसेच अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर्स देण्यात आलेली आहे.

तसेच बाईकचा लूक उत्तम दिसावा याकरिता नवीन ग्राफिक्स देण्यात आले आहे. 9.1 लिटर क्षमतेची इंधन टाकी असून ग्राउंड क्लिअरन्स 165 मिमीचा आहे. या बाईच्या फ्रंट आणि रियर व्हील्समध्ये ड्रम ब्रेक देण्यात आलेले आहेत.

डिझाईनच्या बाबतीत होंडा शाईन पेक्षा ही बाईक चांगली दिसते. एचएफ डीलक्सची इंजिन पावर आणि परफॉर्मन्स खूप चांगल्या पद्धतीचा आहे.

 किती आहे या बाईकची किंमत?

हिरो मोटो कॉर्पच्या एचएफ डीलक्सची एक्स शोरूम किंमत 59998 पासून सुरू होते. मायलेजच्या बाबतीत ही एक तगडी बाईक असून 70 किलोमीटर प्रति लिटरचे मायलेज देते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe