मुंबईच्या गर्दीत लपलेल आहे ‘हे’ निसर्ग सौंदर्याने नटलेले हिल स्टेशन! जाल मुंबई फिरायला तर नक्कीच द्या भेट, मनाला मिळेल शांतता

मुंबईला गेल्यावर आपल्याला माहित आहे की,सगळ्यात अगोदर जुहू चौपाटी तसेच दादर व गिरगाव चौपाटी, गेटवे ऑफ इंडिया इत्यादी स्थळांना मोठ्या प्रमाणावर भेट दिली जाते. परंतु तुम्हाला माहिती आहे का मुंबईच्या या सगळ्या कोलाहालामध्ये एक छानसे आणि निसर्ग सौंदर्याने नटलेले हिल स्टेशन देखील या परिसरात आहे.

yeur hill station

Hill Station In Maharashtra:- पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जर बघितले तर महाराष्ट्रामध्ये अनेक पर्यटन स्थळे असून साधारणपणे प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आपल्याला निसर्गाने नटलेली अशी स्थळे पाहायला मिळतात. त्यामुळे कुठल्याही ऋतू राहिला किंवा कुठलाही कालावधी राहिला तरी पर्यटक हे अशा स्थळांना मोठ्या प्रमाणावर भेटी देतात.

महाराष्ट्रामध्ये सुंदर अशा डोंगरदऱ्या तसेच मन मोहून टाकतील असे धबधबे आपल्याला पावसाळ्यात पाहायला मिळतात. यासोबतच निसर्ग सौंदर्याने नटलेली हिल स्टेशन देखील महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहेत व या ठिकाणी पर्यटकांची कायमच गर्दी होत असते. परंतु जर मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये देखील खूप अशी स्थळे आहेत की त्या ठिकाणी देशातूनच नव्हे तर विदेशातून प्रचंड मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात.

मुंबईला गेल्यावर आपल्याला माहित आहे की,सगळ्यात अगोदर जुहू चौपाटी तसेच दादर व गिरगाव चौपाटी, गेटवे ऑफ इंडिया इत्यादी स्थळांना मोठ्या प्रमाणावर भेट दिली जाते. परंतु तुम्हाला माहिती आहे का मुंबईच्या या सगळ्या कोलाहालामध्ये एक छानसे आणि निसर्ग सौंदर्याने नटलेले हिल स्टेशन देखील या परिसरात आहे.

बोरिवली येथे असणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग म्हणून हे हिल स्टेशन ओळखले जाते. परंतु या हिल स्टेशनला जाण्यासाठी तुम्हाला ठाण्यातून जावे लागते. जर तुम्ही मुंबई फिरायला जायचं प्लान करत असाल तर या हिल स्टेशनला नक्कीच भेट देणे तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरेल.

येऊर हिल स्टेशन आहे मुंबई जवळचे सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन
येऊर हिल स्टेशनला मुंबईचे मिनी महाबळेश्वर आणि मिनी माथेरान म्हणून देखील ओळखतात. तुम्हाला जर मुंबई फिरायला जायचे असेल व मुंबईतील पर्यटन स्थळे पाहून झाल्यानंतर तुम्हाला मुंबईच्या गर्दी पासून निवांत क्षण अनुभवायचे असतील तर तुमच्यासाठी येऊरचे जंगल म्हणजेच हिल स्टेशन एक पर्वणी ठरेल.

या ठिकाणी तुम्हाला ठाण्यातून प्रवेश मिळतो. हा परिसर प्रामुख्याने ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत येतो. हे पर्यटन स्थळ पर्वतांच्या सुंदर रांगेत वसलेले असून पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर भुरळ घालते. तुम्ही जर पावसाळ्यात फिरायला गेलात तर या ठिकाणी खूपच आल्हाददायक व मनाला शांतता देईल असे वातावरण त्या ठिकाणी असते.

तसेच विविध प्रकारची वनस्पती संपदा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते व इतकेच नाही तर वन्य प्राण्यांचा देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वावर आहे.मुंबईतील प्रसिद्ध असलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अर्थात नॅशनल पार्कचाच येऊर जंगल हा एक भाग आहे.

येऊर परिसरामध्ये प्रामुख्याने आदिवासींचे सात पाडे असून साडेतीन हजार इतकी आदिवासी वस्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी खाजगी बंगले तसेच रिसॉर्टची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

दरवर्षी या ठिकाणी पर्यटकांची खूप मोठ्या संख्येने गर्दी होत असते व निसर्ग पर्यटनाचा आनंद या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांच्या माध्यमातून लुटला जातो. त्यामुळे जर तुम्ही मुंबईला फिरायला गेलात आणि त्या ठिकाणी जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी तसेच गेटवे ऑफ इंडिया व तुम्हाला शहरातील जी पर्यटन स्थळे पाहायचे असतील ती पाहून झाल्यानंतर तुम्ही येऊर हिल स्टेशनला नक्कीच भेट द्यावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe