Highway : महाराष्ट्रात सह संपूर्ण देशभरात सध्या रस्ते विकासाची कामे जोमात सुरू आहेत. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंत्रालयाचा कारभार स्वीकारल्यानंतर रस्ते विकासाच्या कामाला गती लाभली आहे. देशभरात वेगवेगळे हायवे, एक्सप्रेस वे आणि ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे उभारण्याचे काम सुरू आहे. मोठमोठाली महामार्ग विकसित होत आहेत. यामुळे साहजिकच दळणवळण व्यवस्था मजबूत होत आहे.
शहरा-शहरांमधील अंतर कमी होत आहे. नुकतेच राजधानी मुंबई आणि देशाची राजधानी दिल्ली यांना जोडणारा दिल्ली मुंबई महामार्गचा पहिला टप्पा म्हणजे सोहना ते दौसा खुला करण्यात आला आहे. याशिवाय गेल्यावर्षी महाराष्ट्रासाठी अति महत्त्वाचा असा मुंबई नागपूर समृद्धी महामार्गचा पहिला टप्पा म्हणजे नागपूर ते शिर्डी प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे.
तसेच या महामार्गाचा दुसरा टप्पा शिर्डी ते मुंबई या वर्षअखेर पूर्ण होणार आहे. याशिवाय सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वेच्या जमिनी संपादनाचे काम देखील सुरू आहे. निश्चितच महाराष्ट्रासह संपूर्ण देशात वेगवेगळी रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. वेगवेगळी हायवे, एक्सप्रेस वे, ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे उभारली जात आहेत. आता हायवे, एक्सप्रेस वे आणि ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे मधला फरक नेमका काय असा प्रश्न अनेकांना पडला असेल. आज आपण याच संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत.
सर्वप्रथम हायवे म्हणजे काय? तर हायवे म्हणजे असा महामार्ग ज्याला अनेक रस्ते जोडले जातात. किंवा त्या महामार्गाच्या पुढे अन्य रस्त्यांना कनेक्ट होता येत. एकंदरीत हायवे म्हणजे बहुमार्गीय रस्त्यांना जोडणारा मार्ग.
एक्सप्रेस वे म्हणजे काय? अनेकांचा हा प्रश्न असतो तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, एक्सप्रेस वे हा असा महामार्ग असतो ज्या मार्गावर पोहोचण्यासाठी खूपच कमी रस्ते असतात. म्हणजेच, एक्सप्रेस वेवर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर त्यासाठी निश्चित मार्ग असतात. त्याच मार्गावरुन एक्सप्रेस वे गाठता येण शक्य असत.
आता ग्रीन फील्ड एक्सप्रेस म्हणजे काय? तर ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे ज्याला ग्रीन फील्ड कॉरिडॉर देखील म्हणतात. हा महामार्ग शहरापासून दूर असतो. म्हणजेच नागरीकरण नसलेल्या भागातुन हा महामार्ग जात असतो. शेती किंवा पडीक जमिनीतून हा महामार्ग विकसित केला जातो. यामुळे कमी खर्चात आणि लवकर असा मार्ग बनत असतो. हा मार्ग ज्या ठिकाणी पूर्वी रस्ता नसतो त्या ठिकाणीच बांधला जातो. भारतमाला परियोजने अंतर्गत केंद्र शासनाने प्रामुख्याने ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे उभारणीवर भर दिला आहे.