Hill Station List In India : निसर्ग सौंदर्य, खळाळणाऱ्या नद्या आणि धबधबे, विविध प्राणी संपदा, पावसाळ्यामध्ये डोंगरांना बीलगलेली ढगे इत्यादी अनेक गोष्टी निसर्गाने जर कोणत्या देशाला भरभरून दिले असेल तर ते भारताला. तुम्ही भारताच्या उत्तर भागाचा विचार करा किंवा दक्षिणेचा तुम्हाला भारताच्या चारही दिशांना आणि मध्य भारतात देखील अनेक निसर्गाने भरभरून दिलेली अनेक ठिकाणी असून उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात भ्रमंती करणाऱ्या पर्यटकांसाठी अशा ठिकाणे खूप महत्त्वाचे आहेत.
या अनुषंगाने आपल्यापैकी बरेच जण पावसाळ्यामध्ये हिल स्टेशनला भेट देतात. भारतामध्ये अनेक हिल स्टेशन आहेत. परंतु त्यातील महत्त्वाचे म्हणजे पश्चिम बंगालमध्ये असलेले मुन्नार, केरळ राज्यात असणारे मनाली आणि हिमाचल प्रदेश मध्ये असणारे मसूरी या तीन हिल स्टेशनची बात काही औरच आहे. या लेखामध्ये आपण या तीनही हिल स्टेशनची थोडक्यात माहिती घेणार आहोत.
‘म‘ ने सुरुवात होणारी निसर्ग सौंदर्यपूर्ण तीन हिल स्टेशन
1- मुन्नार– या हिल स्टेशनचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी पसरलेली हिरवाई होय. हिरवाई पाहत असतानाच तुमचे मन अगदी शांत होते. या ठिकाणी फिरत असताना जेव्हा तुम्ही पर्वत ओलांडून पलीकडे जाल तेव्हा त्या ठिकाणी असलेले चहाचे आणि मसाल्याचे अनेक मळे तुमच्या डोळ्यांची पारणे फेडतात.
या ठिकाणी असलेला इको पॉइंट खूप महत्त्वपूर्ण असून निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असलेली दृश्य आणि तुम्हाला शक्य तितक्या मोठ्याने ओरडायची हौस असेल तर हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी असलेले चिन्नाकनल आणि आतुकल या खळाळणाऱ्या दोन धबधबांचे सौंदर्य पाहून व्यक्ती दुसऱ्याच विश्वात रममान होते. तसेच तुम्ही वन्यजीव आणि प्राणी प्रेमी असाल तर मुन्नार या ठिकाणाहून तुम्हाला पेरियार राष्ट्रीय उद्यानाला देखील भेट देता येणे शक्य आहे.
2- मनाली– हे देखील एक निसर्गाने समृद्ध असलेले हिल स्टेशन असून केरळ राज्यात आहे. भारतातील लोकप्रिय हिल स्टेशन आहे. या ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. बियास नदीच्या काठावर वसलेले मनाली फिरत असताना तुम्ही अनेक नद्यांसोबत फिरत आहात इतक्या नद्या त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात. या ठिकाणी असलेले रिव्हर राफ्टिंग तुम्हाला अनेक रॅपिड्स आणि पाण्यामध्ये अत्यंत साहस दाखवण्यासाठी उद्युक्त करते.
या ठिकाणी तुम्हाला ट्रेकिंगच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पायी ट्रेकिंग करता येतेच परंतु माउंटन बाईकने देखील शिखरावर ट्रॅक करता येते. मनाली मध्ये असलेले वशिष्ठ मंदिर, मनू मंदिर आणि हदिंब मंदिर खूप महत्त्वपूर्ण असून या ठिकाणी अनेक पर्यटक भेटी देतात. तसेच सोलंग व्हॅली हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. हे ठिकाण हिवाळी साहसी खेळांसाठी ओळखले जाते. तसेच मनाली येथे असणारी एक महत्वाचे साईट म्हणजे रहाला धबधबा हा होय.
3- मसूरी – मसुरी हे भारतातील एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ असून ते हिमाचल प्रदेश मध्ये आहे. या ठिकाणी देखील दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. गढवाल पर्वतावर असलेले हे हिल स्टेशन तुम्हाला हिमालयाच्या पर्वतरांगा आणि दुन व्हॅलीच्या अलौकिक दृश्यांचा आनंद देते.
या ठिकाणी असलेले मसुरी तलाव हे ठिकाण खूप प्रेक्षणीय आहे. एवढेच नाही तर केम्पटी फॉल्स पाहणे देखील मनाला खूप आनंददायी देणारे आहे. मसूरी हे एक उद्यान असून या ठिकाणी तुम्ही झिपलाइनिंग, रॉक क्लाइंबिंग आणि रॅपलिंग चा आनंद घेऊ शकता. तसेच या ठिकाणी असलेल्या कंपनी बागेमध्ये तुम्ही बोटिंगचा देखील आनंद घेऊ शकता. तुम्हाला अनेक पार्क राईड्स करण्याची संधी मिळते.