याला म्हणतात जिद्द ! लहानपणी वडिलांचे छत्र हरपलं, आईने मोल-मजुरी करून शिकवलं ; शेतकऱ्यांच्या लेकीन एमपीएससीत नेत्रदीपक यश मिळवलं, STI बनून दाखवलं

Hingoli News : एमपीएससी ही राज्यातील सर्वात कठीण परीक्षापैकी एक. या परीक्षेसाठी राज्यातील लाखो विद्यार्थी तयारी करत असतात. या लाखो विद्यार्थ्यांपैकी काही शेकडो विद्यार्थी एमपीएससी परीक्षेत यश संपादित करतात आणि अधिकारी म्हणून नियुक्त होतात.

एमपीएससीतून थेट अधिकारी पदी निवड होत असल्याने अलीकडे एमपीएससी या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील वाढली आहे. यामुळे कॉम्पिटिशन हाय झाले आहे. या तगड्या कॉम्पिटिशन मधून काही होतकरू आणि बुद्धिवंत विद्यार्थी एमपीएससीची परीक्षा क्रॅक करतात आणि आपलं अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करतात.

काही विद्यार्थी वर्षानुवर्ष तयारी करतात मात्र त्यांना या परीक्षेत यश संपादित करण्यात यश येत नाही. मात्र हिंगोली जिल्ह्यातील लहानपणी वडिलांचे छत्र हरपलेल्या अन आईने मोलमजुरी करून शिकवलेल्या एका शेतकऱ्याच्या लेकीन एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवल आहे.

जिल्ह्यातील मौजे साखरा येथील विद्या कांदे या शेतकऱ्याच्या मुलींन आपल्या आईची कष्टाची जाण ठेवत कठोर मेहनतीच्या जोरावर एमपीएससी अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत यश संपादित केले आहे. यश म्हणजे विद्या परीक्षेत राज्यात सहावी आली आहे.

यामुळे सध्या विद्याने प्रतिकूल परिस्थितीवर मिळवलेले हे घवघवीत यश चर्चेचा विषय ठरत आहे. विद्याने 2021 मध्ये एसटीआय पदासाठी परीक्षा दिली होती. या परीक्षेत विद्याने चांगली नेत्रदीपक कामगिरी केली असून राज्यात सहावा क्रमांक पटकावला आहे. विद्याच्या या नेत्रदीपक यशाची चहूबाजूने वाहवाही होत आहे.

विद्याने सुरुवातीचे शिक्षण आपल्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतले. दहावी झाल्यानंतर वणीच्या नवोदय विद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. ती सध्या आपल्या गावातच ग्रामीण डाक सेवक म्हणून कार्यरत आहे.

म्हणजेच ग्रामीण डाक सेवक पदावर कार्यरत असतानाच तिने एमपीएससी साठी तयारी केली असून आता एमपीएससी परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाली असून एसटीआय पद मिळवले आहे. विशेष म्हणजे या परीक्षेत तिने मुलींमधून सहावा क्रमांक पटकावून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे.

विद्याच्या या यशात तिच्या कुटुंबाचा मोठा हातभार आहे. विद्या लहान असतानाच तिच्या वडिलांचा स्वर्गवास झाला. घराची सर्व जबाबदारी तिच्या आईवर आली. आईने देखील वेळप्रसंगी मोलमजुरी करून मुलांचा शिक्षणाचा भार पेरला. मोठे झाल्यानंतर शिक्षणाचा खर्च वाढला परिणामी विद्याच्या भावाला म्हणजेच विकासला शिक्षण सोडावे लागले.

मात्र विकास यांनी आपल्या बहिणीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली. यामुळे विद्या यांच्या यशामागे त्यांच्या बंधूंचे मोठे कष्ट दडले आहेत. आज विद्या एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली असून एसटीआय पदाला गवसणी घातली आहे, यामुळे तिने पाहिलेलं स्वप्न आज प्रत्यक्षात खरं उतरल आहे. प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेलं हे यश निश्चितच इतरांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe