हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानचा प्रवास आता फक्त 25 मिनिटात ! ‘या’ दिवशी सुरू होणार पुण्यातील नवा मेट्रो मार्ग

सध्या स्थितीला शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू असून लवकरच शहराला आणखी एका मेट्रोमार्गाची भेट मिळणार आहे. पुणे मेट्रोचा हा तिसरा मार्ग असून लवकरच हा मेट्रो मार्ग सर्वसामान्य पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.

Tejas B Shelar
Published:
Hinjewadi Shivaji Nagar Metro Line

Hinjewadi Shivaji Nagar Metro Line : सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये होणारी वाहतूक कोंडी ही एक कॉमन गोष्ट बनलीये. मात्र हळूहळू पुण्यातील ही वाहतूक कोंडी दूर होण्याच्या मार्गावर आहे. शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शासनाने प्रशासनाच्या माध्यमातून शहरात नवनवीन मेट्रो मार्ग विकसित होत आहेत.

सध्या स्थितीला शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू असून लवकरच शहराला आणखी एका मेट्रोमार्गाची भेट मिळणार आहे. पुणे मेट्रोचा हा तिसरा मार्ग असून लवकरच हा मेट्रो मार्ग सर्वसामान्य पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.

शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान विकसित होणाऱ्या मेट्रो मार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून येत्या काही दिवसात हा मार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू केला जाणार आहे. जेव्हा हा मेट्रो मार्ग पूर्णपणे कार्यान्वित होईल तेव्हा हा प्रवास अवघ्या 25 मिनिटाच्या वेळेत पूर्ण होणार आहे.

सध्या स्थितीला शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान चा प्रवास पूर्ण करण्यासाठी प्रवाशांना एक ते दीड तासाचा कालावधी खर्च करावा लागतोय. मात्र हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर हा प्रवास वीस ते पंचवीस मिनिटात पूर्ण होणार असल्याने याचा या भागातील प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.

खरंतर, हिंजवडी हा भाग आयटी हब म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी शहरातील मध्यवर्ती भागामधून अर्थातच शिवाजीनगर मधून अनेकजण कामाला येतात. दरम्यान शहरातील याच कर्मचाऱ्यांसाठी हा नवा मेट्रो मार्ग विकसित होत आहे.

सध्या स्थितीला शिवाजीनगर ते हिंजवडी असा प्रवास करायचा झाला तर रस्ते मार्गाने जावे लागते. मात्र हा मार्ग सुरू झाल्यानंतर शिवाजीनगर ते हिंजवडी असा प्रवास पूर्ण करण्यासाठी मेट्रोची देखील सुविधा उपलब्ध होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या तिसऱ्या मेट्रो मार्गाचे काम जवळपास 74 टक्के पूर्ण झाले आहे. तसेच बाकी राहिलेले काम हे मार्च 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा मेट्रो मार्ग पहिल्यांदाच पीपीपी तत्त्वावर विकसित होतोय.

पीपीपी तत्त्वावर विकसित होणारा हा देशातील पहिलाच मेट्रो मार्ग आहे. हा प्रकल्प टाटा समूहाने हाती घेतला असून यासाठी एका विशिष्ट कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी 8300 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर 23.3 किमी मेट्रो मार्ग आहे.

त्यावर एकूण 23 मेट्रो स्थानके आहेत. या मार्गावर ताशी 80 ते 85 किमी वेगाने मेट्रो धावणार आहे. एका मेट्रोत 1000 प्रवासी बसू शकतात. या प्रकल्पाची भूमिपूजन 2018 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते आणि आता हा प्रकल्प पुढील वर्षी सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe