Honda Elevate Car:- भारतामध्ये प्रामुख्याने कुठलाही कार खरेदी करणारा जर नवीन ग्राहक असेल तर तो प्रामुख्याने महिंद्रा अँड महिंद्रा तसेच मारुती सुझुकी, टाटा मोटर्स यासारख्या कंपन्यांच्या कार खरेदी करण्याला प्राधान्य देतो. त्यासोबतच होंडा कार्स इंडिया ही कंपनी देखील आपल्याला या तीनही कंपन्यांच्या स्पर्धेमध्ये दिसून येते.
होंडाच्या कार खरेदी करण्याकडे देखील ग्राहकांचा कल आपल्याला दिसून येतो. अगदी याच पद्धतीने जर आपण होंडा कार इंडिया या कंपनीच्या एका कारबद्दल बघितले तर ही कार होंडा कंपनीने गेल्या वर्षी भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केलेली होती व या कारला ग्राहकांकडून तुफान अशी प्रसिद्धी मिळाली असून अलीकडेच प्रसिद्ध झालेले एका अहवालानुसार बघितले तर एका वर्षभरात या होंडाच्या कॉम्पॅक्ट एसयुव्हीचे तब्बल 90 हजार युनिट विक्री झाल्याची माहिती समोर आलेली आहे.
त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर विक्री होणारी होंडाची ही कार नेमकी कोणती आहे? हा प्रश्न नक्कीच आपल्या मनात येईल. तर या प्रश्नाचे उत्तर आहे की ही सर्वात जास्त विक्री होणारी होंडाची कार म्हणजे होंडा एलिव्हेट होय.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये ही कार लॉन्च करण्यात आलेली होती.विशेष म्हणजे होंडा कार्स इंडियाची जपानमध्ये निर्यात होणारी पहिली मेड इन इंडिया मॉडेल आहे. त्यामुळे या लेखात आपण या कारमध्ये नेमकी विशेष असे काय आहे? ग्राहकांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी या कारला का पसंती दिली याबद्दलची माहिती थोडक्यात बघू.
होंडा एलिव्हेटची काय आहेत वैशिष्ट्ये?
होंडा एलिव्हेट उत्तम अशी फीचर्स असलेली कार असून या कारचे इंटिरियर जर बघितले तर यामध्ये 10.25 इंचाचा इन्फोटेनमेंट स्क्रीन, सात इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जर आणि सिंगल पेन सनरूफ देण्यात आलेली आहे. इतकेच नाहीतर या कारमध्ये स्टीअरिंग माऊंटेड कंट्रोल्स,
ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, होंडा कनेक्ट आणि होंडा सेंसिंग एडीएएस टेक अशी फीचर्स देखील देण्यात आलेले आहेत. तसेच मल्टी फंक्शनल स्टेरिंग व्हिल आणि स्वयंचलित हवामान नियंत्रणाची सुविधा देखील देण्यात आली आहे. याशिवाय अडॅप्टीव्ह क्रूज कंट्रोल, लेन कीपिंग असिस्ट, ऑटोमॅटिक हाय बीम असिस्ट आणि ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग देखील देण्यात आले आहे.
कसे आहे होंडा एलिव्हेटचे इंजिन?
होंडा एलिव्हेटमध्ये एक 1.5- लिटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले असून हे इंजिन 119 बीएचपी आणि 145 एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच हे इंजिन अनुक्रमे 15.31 किलोमीटर पर लिटर आणि 16.92 किलोमीटर पर लिटरच्या ARAI प्रमाणित इंधन कार्यक्षमतेसह 6 स्पीड मॅन्युअल किंवा 7 स्पीड सीव्हीटी युनिटसह जोडण्यात आलेले आहे.