Home Building Rule : आपल्यापैकी अनेकांचे स्वतःचे एक घर असावे असे स्वप्न असेल. त्यासाठी आपण अहोरात्र काबाडकष्ट करतो. घर बांधताना आपल्या आयुष्यातील सर्व जमापुंजी खर्च होत असते. त्यामुळे घर बांधताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
अलीकडे वाढती महागाई, बिल्डिंग मटेरियलचे वाढलेले दर, वाढलेले इंधनाचे दर, वाढती मजुरी या साऱ्या पार्श्वभूमीवर घर बनवण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागतो. अनेकांना त्यांनी त्यांच्या आयुष्यात कमावलेला सर्व पैसा घरासाठी खर्च करावा लागतो.
अशा परिस्थितीत, जर तुम्ही बांधलेले घर अतिक्रमणात आले तर तुमच्या संपूर्ण आयुष्याची जमापुंजी वाया जाण्याची शक्यता आहे. यामुळे हायवेपासून किंवा रस्त्यापासून किती अंतरावर घर बांधले पाहिजे याची माहिती तुम्हाला असायला हवी. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
घर किती दूर असावे ?
भूमी नियंत्रण नियम, 1964 नुसार, राष्ट्रीय किंवा प्रांतीय महामार्गावरील कोणत्याही रस्त्याच्या मध्य रेषेपासून 75 फूट अंतराच्या आत कोणत्याही खुल्या किंवा कृषी क्षेत्रात घर किंवा कोणतेचं इतर बांधकाम केले जाऊ शकत नाही. तसेच शहरी भागात रस्त्याच्या मध्य रेषेपासून 60 फुट अंतरापर्यंत कोणतेही बांधकाम केले जाऊ शकत नाही.
याशिवाय, कोणत्याही महामार्गाच्या मध्यवर्ती रेषेपासून 40 मीटर अंतराच्या आत कोणतेही बांधकाम केले जाऊ शकत नाही. तसेच जर राष्ट्रीय महामार्गलगत 40-75 मीटरच्या परिघाच्या आत घर किंवा इतर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करायचे असेल तर बांधकामासाठी प्रथम NHAI कडून परवानगी घ्यावी लागणार आहे.
जर या नियमांचे उल्लंघन झाले आणि शासनाने ठरवून दिलेल्या अंतराच्या आत घराचे बांधकाम केले गेले तर असे बांधकाम अवैध मानले जाते. अशा अतिक्रमणावर कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते. त्यामुळे घर बांधताना या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जर या नियमांचे पालन केले गेले नाही तर कठोर कारवाई होऊ शकते. घर बांधण्यासाठी आलेला लाखो रुपयांचा खर्च यामुळे वाया जाण्याची भीती असते.