PPF योजना कशी आहे गुंतवणुकीसाठी फायद्याची? कुठलीही जोखीम न घेता कसे कमवू शकतात लाखो रुपये? जाणून घ्या पूर्ण माहिती

PPF Scheme: गुंतवणुकीसाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध असून गुंतवणूकदार यामध्ये गुंतवणुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ज्या पर्यायामध्ये गुंतवणूक करण्यामध्ये जोखिम कमी आहे अशा योजनांमध्ये गुंतवणूक करायला प्राधान्य देतात.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे केलेल्या गुंतवणुकीतून फायदेशीर परतावा मिळेल हा देखील एक विचार केला जातो. याच कारणांमुळे गुंतवणूकदार जास्त करून बँकांच्या मुदत ठेव आणि पोस्ट ऑफिसच्या योजनांना प्राधान्य देताना आपल्याला दिसून येतात.

तसेच यामध्ये सरकारच्या देखील अनेक योजना असून त्या दीर्घकालीन सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणुकीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत.

यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफ ही योजना होय.ज्या व्यक्तींना केलेल्या गुंतवणुकीवर उत्तम परतावा हवा आहे आणि दीर्घ कालावधीसाठी निश्चित परताव्याची इच्छा आहे अशा गुंतवणूकदारांना ही योजना खूप चांगला पर्याय आहे.

या योजनेमध्ये तुम्ही खात्यात वार्षिक कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवू शकतात. या योजनेचा परिपक्वता कालावधी पंधरा वर्षांचा असून सध्या या योजनेत 7.1% दराने व्याज मिळत आहे.

 पीपीएफ योजनेच्या माध्यमातून मिळतात कर सवलतीचे फायदे

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ योजनेत केलेल्या गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामध्ये तीन पद्धतीने करात सूट मिळू शकते. यातील पहिला प्रकार जर पाहिला तर तुम्ही या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर कलम  80C अंतर्गत करात सूट मिळवू शकतात.

दुसरा प्रकार म्हणजे या योजनेत तुम्हाला जे काही व्याज मिळते त्यावर देखील कुठल्याही प्रकारचा कर लागत नाही व तिसरा कर सवलतीचा प्रकार म्हणजे ही योजना जेव्हा परिपक्व होऊन तुम्हाला जी काही एकूण रक्कम परतावा म्हणून मिळते ती देखील पूर्णपणे करमुक्त असते.

यामुळेच पीपीएफ हा एक लोकप्रिय गुंतवणूक पर्याय म्हणून पुढे येत आहे. ज्या गुंतवणूकदारांना कर बचतीसह दीर्घकालीन आणि सुरक्षित गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी पीपीएफ योजना उत्तम असा गुंतवणूक पर्याय आहे.

 मुदत पूर्ण झाल्यानंतर देखील व्याजाचा लाभ मिळतो

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ योजनेचे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जेव्हा या योजनेचा पंधरा वर्षांचा परिपक्वता कालावधी संपतो त्यावेळेस तुम्ही जर तुमच्या खात्यातून पैसे काढले नाहीत तर तुमचे पैसे सुरक्षित राहतात व त्यावर तुम्हाला व्याज देखील मिळत राहते.

सध्याचा जो काही या योजनेचा व्याजदर आहे त्यानुसार हे व्याज मिळत राहते. तसेच कर सवलतीची सूट देखील लागू राहते. तसेच तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही खात्यातून पैसे काढू शकतात.

यामध्ये तुम्ही एकाच वेळी रक्कम काढू शकता किंवा तुम्हाला आवश्यक असेल तेवढी रक्कम देखील या माध्यमातून काढता येते व बाकीची रक्कम खात्यात जमा करू शकतात. बाकीच्या रकमेवर तुम्हाला व्याजाचा फायदा हा मिळतच राहतो.

 या पद्धतीने मिळवता येतो तुम्हाला व्याजाचा जास्त फायदा

तुम्हाला पीपीएफ खात्यातून मिळणाऱ्या व्याजाचा अधिक फायदा मिळवायचा असेल तर तुम्ही पाच वर्षाच्या ब्लॉकमध्ये या योजनेत वाढ करू शकतात व अशा पद्धतीने पाच पाच वर्षांची वाढ तुम्हाला अमर्यादित वेळा करता येते.

परंतु अशा प्रकारची वाढ करण्याकरिता तुम्हाला तुमच्या या योजनेचे खाते असलेल्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये या संबंधीचा अर्ज सबमिट करावा लागतो.

अशा पद्धतीने तुम्हाला पीपीएफ खाते योजनेच्या परिपक्वतेनंतर वाढवायचे असेल आणि गुंतवणूक सुरूच ठेवायची असेल तर तुम्हाला मॅच्युरिटीच्या तारखेपासून एक वर्षाच्या आत बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये त्यासंबंधीचा अर्ज दाखल करावा लागतो. त्याकरता तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल जो तुमची पीपीएफ खाते असलेल्या बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या शाखेत जमा करावा लागतो.

या योजनेतून मोठा निधी जमा करता येतो

सरकारची ही योजना गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सुरक्षितच नाही तर दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करून मोठा निधी तयार करण्यासाठी खूप फायद्याची आहे.

तिन्ही प्रकारावर मिळणारी करमाफी तसेच खात्रीशीर व्याजदर आणि मुदत संपल्यानंतरही व्याज मिळण्याची सुविधा यामुळे ही एक लोकप्रिय आणि विश्वासार्ह अशी गुंतवणूक योजना आहे.