SBI Car Loan : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून संपूर्ण जगात ख्यातनाम आहे. दरम्यान पब्लिक सेक्टर मधील ही बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज परवडणाऱ्या व्याजदरात उपलब्ध करून देत आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदर कार लोन सुद्धा उपलब्ध करून देते. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही एसबीआय कडून कार लोन घ्यायचे असेल तर आजची बातमी कामाची राहणार आहे. कारण की आज आपण एसबीआयच्या कार लोनची डिटेल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे आहे एसबीआयचे कार लोन?
खरंतर, जून महिन्यात देशभरातील विविध ऑटो कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या लोकप्रिय वाहनांवर चांगला मोठा डिस्काउंट ऑफर केला जात आहे. त्यामुळे अनेक जण या महिन्यात नवीन वाहन खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान जर तुम्हालाही या महिन्यात नवीन कार खरेदी करायची असेल आणि त्यासाठी कार लोन घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी एसबीआयचा पर्याय बेस्ट राहणार आहे कारण की एसबीआय परवडणाऱ्या व्याजदरात कार लोन देते. आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, स्टेट बँक ऑफ इंडिया कडून सध्या स्थितीला आपल्या ग्राहकांसाठी 9.20% या किमान व्याजदरात कार लोन उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र या व्याजदरात जर तुम्हाला एसबीआय कडून कार लोन घ्यायचे असेल तर तुमचा सिबिल स्कोर 800 च्या आसपास असायला हवा. ज्या लोकांचा सिबिल स्कोर 800 च्या आसपास असतो अशा लोकांना एसबीआय कडून किमान व्याजदरात कार लोन उपलब्ध करून दिले जात आहे.

8 लाखांचे कार लोन घेतल्यास किती रुपयांचा ईएमआय भरावा लागणार?
जर समजा एसबीआय कडून एखाद्या ग्राहकाला आठ लाख रुपयांचे कार लोन किमान 9.20% व्याजदरात पाच वर्षांसाठी मंजूर झाले तर अशा ग्राहकाला 16,684 रुपयांचा मासिक हप्ता म्हणजेच ईएमआय भरावा लागणार आहे. म्हणजेच या कालावधीत सदर ग्राहकाला दहा लाख एक हजार 40 रुपये भरावे लागणार आहेत. अर्थातच दोन लाख एक हजार 40 रुपये फक्त व्याज म्हणून बँकेला द्यावे लागतील.