सिलेंडरमध्ये किती LPG Gas शिल्लक आहे? १ मिनिटात ओळखण्याची जबरदस्त ट्रिक!

Published on -

स्वयंपाकघरात काम करताना अचानक गॅस संपलाय, आणि अर्धवट अन्न शिजत पडलंय ही परिस्थिती आपल्या सगळ्यांनाच कधीतरी अनुभवायला आलीच असेल. आणि जर तुमच्याकडे फक्त एकच सिलेंडर असेल, तर मग तर ही अडचण आणखीनच मोठी वाटते. त्यात पाहुणे घरी आले असतील, किंवा एखादा खास पदार्थ बनवायचा असेल, आणि अचानक गॅस संपला – मग सगळा मूडच खराब होतो. अशावेळी मनात एकच प्रश्न येतो – अगदी थोडंसं जरी आधी कळलं असतं, तर तयारी करता आली असती ना!

सामान्यतः आपण सिलेंडरचं वजन हाताने उचलून पाहतो, किंवा कधी स्टोव्हमधून येणाऱ्या आगीच्या रंगावरून अंदाज बांधतो की गॅस संपायला आलाय का. पण हे अंदाज कधी बरोबर येतात, तर कधी आपल्याला फसवतात. कारण कधी स्टोव्हचाच काहीतरी प्रॉब्लेम असतो, ज्यामुळे आगीचा रंगच चुकतो. त्यामुळेच आज एक अशी सोपी आणि घरगुती ट्रिक सांगणार आहोत, जी एक मिनिटात तुम्हाला गॅस सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे अचूकपणे सांगेल.

ही ट्रिक अगदी सहज आहे –फक्त एक टॉवेल लागतो. तुमच्याकडे जुना, थोडासा ओला टॉवेल घ्या आणि तो सिलेंडरभोवती गुंडाळा. साधारण एक मिनिट त्याला तसेच ठेवून द्या. त्यानंतर तो टॉवेल काढा आणि सिलेंडरच्या बाहेरचा भाग बघा. लक्ष द्या सिलेंडरचा जो भाग गॅसने भरलेला आहे, तो भाग थंड असतो, त्यामुळे टॉवेलने ओलसर झालेला भाग थोडा वेळ ओला राहतो. उलट जो भाग गॅसशिवाय रिकामा आहे, तिथे गरमपणा असल्यामुळे तो भाग पटकन कोरडा होतो.

ही प्रक्रिया विज्ञानाच्या अगदी सोप्या तत्त्वावर आधारित आहे. आपल्या स्वयंपाकाच्या सिलेंडरमध्ये एलपीजी म्हणजेच लिक्विड पेट्रोलियम गॅस भरलेला असतो, ज्यात द्रव स्वरूपात गॅस असतो. द्रव असतो म्हणून तो भाग थंड राहतो आणि ओलसर टॉवेल लवकर सुकत नाही. त्यामुळे थोडसं निरीक्षण आणि लक्ष दिलं, तर तुम्ही सहज सांगू शकता किती गॅस उरला आहे आणि किती संपला आहे.

ही ट्रिक लक्षात ठेवलीत, तर पुढच्यावेळी अचानक गॅस संपून अडचण होण्याची शक्यता कमीच. त्यात कोणालाही पुन्हा गॅसचं वजन उचलत अंदाज बांधायची गरज नाही, की स्टोव्हकडे पाहून गोंधळायचं कारण नाही. एक टॉवेल, एक मिनिट, आणि थोडं निरीक्षण बस्स! आणि तुमचं स्वयंपाकघर गॅसच्या बाबतीत ‘सुरक्षित झोन’मध्ये येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!