बँक ऑफ बडोदाच्या 444 दिवसांच्या एफडी योजनेत 10 लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?

बँक ऑफ बडोदाच्या एफडी योजनेत गुंतवणुकीचा प्लॅन आहे का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहील. कारण, आज आपण बँक ऑफ बडोदाच्या 444 दिवसांच्या एफडी योजनेची डिटेल माहिती जाणून घेणार आहोत.

Published on -

Bank Of Baroda Scheme : तुम्हालाही फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करायची आहे का ? मग तुमच्यासाठी बँक ऑफ बडोदाचा पर्याय बेस्ट राहील. खरंतर, आरबीआयकडून गेल्या काही महिन्यांच्या काळात रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी आरबीआयने रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांची कपात केली आहे आणि आरबीआयच्या या निर्णयानंतर देशभरातील विविध बँकांकडून फिक्स डिपॉझिटच्या व्याज दरात सुद्धा कपात केली जात आहे. अशा परिस्थितीत, आज आपण बँक ऑफ बडोदाच्या 444 दिवसांच्या गुंतवणूकदारांना काय दराने व्याज दिले जात आहे ? बँक ऑफ बडोदाची 444 दिवसांची एफडी योजना कशी आहे ? याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

बँक ऑफ बडोदाची 444 दिवसांची एफडी योजना कशी आहे ?

बँक ऑफ बडोदा ही देशातील प्रमुख सरकारी बँक आहे. बँक ऑफ बडोदा देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सरकारी बँक असुन ही बँक आपल्या ग्राहकांना एफडी वर चांगले व्याजदर ऑफर करत आहे. या बँकेच्या 444 दिवसांच्या एफडी योजनेबाबत बोलायचं झालं तर यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना बँकेकडून 6.65% दराने व्याज दिले जात आहे.

मात्र हे व्याजदर 60 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या सामान्य ग्राहकांसाठी लागू आहेत. तसेच यात गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना म्हणजे साठ वर्षांवरील ग्राहकांना 7.15% दराने व्याज ऑफर केले जात आहे. दरम्यान आता आपण बँक ऑफ बडोदाच्या 444 दिवसांच्या एफडी योजनेत दहा लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार याचे कॅल्क्युलेशन जाणून घेणार आहोत.

दहा लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?

बँक ऑफ बडोदा च्या 444 दिवसांच्या एफडी योजनेत सामान्य ग्राहकांनी दहा लाखांची गुंतवणूक केल्यास त्यांना मॅच्युरिटीवर म्हणजेच एफडी योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर दहा लाख 81,465 रुपये मिळणार आहेत म्हणजेच 81,465 रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळतील.

तसेच जर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांनी या योजनेत दहा लाखांची गुंतवणूक केली तर त्यांना मॅच्युरिटीचा काळ पूर्ण झाल्यानंतर म्हणजे 444 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर दहा लाख 87 हजार 636 रुपये मिळणार आहेत म्हणजेच 87 हजार 636 रुपये व्याज स्वरूपात मिळणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!