महाराष्ट्र मध्ये सध्या सगळ्यात मोठ्या प्रमाणावर चर्चेला असणारी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही होय.या योजनेच्या माध्यमातून महिलांना आता प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे रुपयांचा थेट लाभ मिळणार आहे व आतापर्यंत जवळपास कोट्यावधी महिलांनी राज्यातून या योजनेकरिता अर्ज केलेले आहेत व बऱ्याच महिलांच्या खात्यावर या योजनेच्या पैसा देखील जमा झालेला आहे.
परंतु काही कारणामुळे काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत व यामागे आधार लिंकची समस्या प्रामुख्याने येत असल्याने त्याबाबतीत देखील आता शासनाकडून पावले उचलण्यात येत असून प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहेत.
आता माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करता येईल का?
जेव्हा राज्याचे पावसाळी अधिवेशन पार पडले तेव्हा या अधिवेशनामध्ये अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी या योजनेची घोषणा केलेली होती.जेव्हा या योजनेची घोषणा करण्यात आली तेव्हा 15 ऑगस्टपर्यंत या योजनेत अर्ज करण्याची मुदत देण्यात आलेली होती.
नंतर या मुदतीमध्ये 31 ऑगस्ट पर्यंत वाढ करण्यात आली व 31 ऑगस्ट पर्यंत अनेक महिलांनी या योजनेसाठी अर्ज सादर केले. परंतु बऱ्याच महिला अर्ज करू शकले नाहीत व त्याकरिता आताही मुदत 30 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे व त्यामुळे आता ज्या महिला पात्र असतील ते 30 सप्टेंबर पर्यंत यात अर्ज करू शकणार आहेत.
जॉईंट अर्थात संयुक्त बँक खाते या योजनेसाठी ग्राह्य आहे का?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मिळणारे पंधराशे रुपये हे महिलेच्या बॅक खात्यामध्ये थेटपणे हस्तांतरित करण्यात येतात.जर या योजनेचा उद्देश पाहिला तर यातून मिळणारा जो काही निधी आहे त्याचा वापर फक्त महिला वर्गाला त्यांच्यासाठी करता यावा हा उद्देश प्रामुख्याने असल्याने या योजनेसाठी सिंगल अर्थात
वैयक्तिक स्वतंत्र खात्याचा नियम करण्यात आला असून त्यामुळे या योजनेमध्ये जॉईंट अकाउंट धारक महिला पात्र ठरणार नाहीत. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे या योजनेत महिलांचे स्वतंत्र खाते असणे गरजेचे आहे. संयुक्त खातेदार महिला असतील तर महिलांनी कोणत्याही बँकेत जाऊन नवीन वैयक्तिक स्वतंत्र खाते उघडणे गरजेचे आहे.
अर्ज स्वीकारले गेलेत परंतु पैसेच नाही मिळाले
यामध्ये ज्या पात्र महिलांनी अर्ज केले आहेत त्यातील बऱ्याच महिलांचे अर्ज हे स्वीकारण्यात आलेले आहेत. परंतु अर्ज स्वीकारल्यानंतर देखील बऱ्याच महिलांना पैसे आलेले नाहीत. असं जर तुमच्या सोबत देखील घडलं असेल तर तुम्ही पटकन तुमच्या आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही हे एकदा तपासून पाहणे गरजेचे आहे.
जर ते लिंक नसेल तर मात्र बँकेमध्ये जाऊन ते ताबडतोब लिंक करून घ्यावे. बँकेला आधार कार्ड लिंक झाल्यास पटकन तुमच्या खात्यात पैसे येतील. परंतु बँक खाते आधारशी लिंक आहे परंतु तरीदेखील पैसे आले नसतील तर तुम्ही काही वेळ वाट पाहणे गरजेचे आहे.
सप्टेंबरमध्ये अर्ज केला तर किती मिळतील पैसे?
यामध्ये आपल्याला माहित आहे की ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केलेले होते अशा पात्र महिलांना जुलै,ऑगस्ट अशा दोन महिन्याचे पैसे मिळालेत. म्हणजे पात्र महिलांना दोन्ही महिने मिळून तीन हजार रुपयांचा लाभ देण्यात आला.
परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याचे पैसे मिळणार की एकाच महिन्याचे मिळणार असा प्रश्न मात्र अनेक जणांना पडलेला आहे.
मात्र याबाबत सरकारच्या माध्यमातून देखील कोणत्याही प्रकारच्या अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसल्याचे मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून कळविण्यात आलेले आहे.