Personal Loan:- भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर सध्या पर्सनल लोन घेतले जात असून आयुष्यातील अनेक प्रकारच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी या लोनचा वापर केला जात आहे. बऱ्याचदा काही लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करायची असेल किंवा नवीन मोबाईल घ्यायचा असेल किंवा एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली असेल तर बरेचजण आता पर्सनल लोनचा पर्याय निवडत आहेत.
गुगल ट्रेंड्स वर देखील पर्सनल लोन कीवर्ड आता ट्रेंड होताना दिसून येत असून अगदी सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे गुगलवर देखील आता पर्सनल लोनच्या संदर्भात अधिक माहिती शोधली जात आहे.
परंतु जेव्हा आपण पर्सनल लोन घेण्याचा विचार करतो तेव्हा ते घेताना आपल्याला जास्तीचे व्याज द्यावे लागते व बऱ्याचदा यामुळे आपली आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. पर्सनल लोनचा व्याजदर जास्त असल्यामुळे कर्ज फेडण्यासाठी बराच कालावधी लागतो.
त्यामुळे पर्सनल लोन घेण्याअगोदर वेगवेगळ्या बँका तसेच बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांचे व्याजदर यांची तुलना करून कमीत कमी व्याजदरात कर्ज मिळवणे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे या लेखात आपण सर्वात स्वस्तात पर्सनल लोन देणाऱ्या बँक आणि एनबीएफसीची माहिती बघणार आहोत.
कोणत्या बँक आणि एनबीएफसी देतात सर्वात स्वस्त पर्सनल लोन?
1- पिरामल फायनान्स– पिरामल फायनान्सच्या माध्यमातून सहजपणे पर्सनल लोनची सुविधा ग्राहकांना दिली जात आहे. यामध्ये जर तुम्ही पर्सनल लोन घेतले तर तुम्हाला 12.99% वार्षिक व्याजदरा पासून पर्सनल लोनची सुविधा दिली जात असून याठिकाणी तुम्ही दहा लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन घेतले तर ते परतफेड करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त पाच वर्षांचा कालावधी दिला जातो.
2- डीएमआय फायनान्स– डीएमआय फायनानच्या माध्यमातून जर तुम्ही पर्सनल लोन घेतले तर त्यावर 12% वार्षिक व्याजदर आकारला जातो व या ठिकाणी देखील तुम्हाला पर्सनल लोनची रक्कम परतफेड करण्यासाठी पाच वर्षाचा कालावधी दिला जातो.
म्हणजे डीएमआय फायनान्सकडून तुम्ही पर्सनल लोनसाठी अर्ज करत असाल तर ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीची असून तुम्हाला कोणत्याही कागदपत्रांशिवाय ही प्रक्रिया पूर्ण करता येते.
3- टाटा कॅपिटल– तुम्ही जर टाटा कॅपिटल लिमिटेडच्या माध्यमातून पर्सनल लोन घ्यायचा विचार केला तर तुम्हाला ते वर्षाला 10.99% व्याजदर आकारते. विशेष म्हणजे टाटा कॅपिटल लिमिटेडच्या माध्यमातून तुम्हाला 50 लाख रुपयांपर्यंतच्या लोनकरिता ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो.
4- कोटक महिंद्रा बँक– कोटक महिंद्रा बँकेकडून जर तुम्ही पर्सनल लोन घेतले तर वर्षाला 10.99% इतका व्याजदर आकारला जातो व 40 लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन तुम्हाला कोटक महिंद्रा बँकेकडून मिळू शकते. या बँकेकडून जर तुम्ही पर्सनल लोन घेतले तर तुम्हाला सहा वर्षाचा कालावधी परतफेडकरिता दिला जाऊ शकतो.
5- पंजाब नॅशनल बँक– पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून तुम्हाला वीस लाख रुपये पर्यंत पर्सनल लोन दिले जाते. बँकेकडून वर्षाला 10.40% इतका व्याजदर आकारला जातो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या घेतलेल्या पर्सनल लोनची परतफेड करण्यासाठी तुम्हाला बँकेकडून सात वर्षांचा कालावधी दिला जातो.
जर तुम्ही पेन्शन होल्डर म्हणजेच निवृत्तीवेतनधारक असाल तर तुम्हाला त्यापेक्षा कमी व्याजदराने पाच वर्षांसाठी पर्सनल लोन मिळते. त्यामुळे सगळ्या बँकांपेक्षा पंजाब नॅशनल बँकेचे पर्सनल लोन हे ग्राहकांना परवडण्यासारखे आहे.