हाताच्या बोटाच्या लांबीवरून ओळखा व्यक्तीच्या आड लपलेले रहस्य आणि त्याचे व्यक्तिमत्व! जाणून घ्या माहिती

समाजामध्ये जेव्हा आपण वावरत असतो तेव्हा दररोज आपल्याला अनेक प्रकारचे लोक भेटत असतात व प्रत्येकाचे व्यक्तिमत्व आणि वागणूक ही इतरांपेक्षा वेगवेगळी असल्याचे आपल्याला दिसून येते. या सगळ्या व्यक्तींमध्ये प्रत्येकाचा स्वभाव देखील वेगवेगळ्या असतो.

Ajay Patil
Published:
personality test

Personality Test:- समाजामध्ये जेव्हा आपण वावरत असतो तेव्हा दररोज आपल्याला अनेक प्रकारचे लोक भेटत असतात व प्रत्येकाचे व्यक्तिमत्व आणि वागणूक ही इतरांपेक्षा वेगवेगळी असल्याचे आपल्याला दिसून येते. या सगळ्या व्यक्तींमध्ये प्रत्येकाचा स्वभाव देखील वेगवेगळ्या असतो.

यामध्ये कुठलीही व्यक्ती आपल्याशी कशा पद्धतीने बोलत आहे यावरून किंवा त्याच्यात बोलण्या चालण्याच्या पद्धतीवरून आपण त्याचा स्वभाव कसा आहे? याबाबतचा एक अंदाज लावत असतो. परंतु नुसते त्याच्या बोलण्यावरून किंवा चालण्यावरून त्याचा स्वभाव विषयी अंदाज बांधणे प्रत्येक वेळेस बिनचूक राहील असे होत नाही.

बऱ्याचदा काही परिस्थितीनुसार देखील व्यक्तीच्या बोलण्यात किंवा वागण्यात बदल होऊ शकतो. या व्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल जर माहिती करून घ्यायची असेल तर त्याच्या शरीराच्या अवयवांचा आकारावरून देखील आपल्याला बरीच माहिती मिळू शकते.

त्यामुळे या लेखात आपण एखाद्या व्यक्तीच्या बोटांचा आकार पाहून देखील त्याचे व्यक्तिमत्व कसे ओळखता येते? त्याबद्दलची माहिती थोडक्यात बघू.

हाताच्या बोटांच्या आकारावरून किंवा लांबीवरून ओळखा एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व

1- लांब तर्जनी- आपण बघतो की काही लोकांची तर्जनी लांब असते व अशा प्रकारे लांब तर्जनी असलेले लोक हे मुळातच खूप हुशार असतात व त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण देखील मोठ्या प्रमाणावर असतो.तसेच तर्जनी जर मधल्या बोटासारखी असेल तर त्या लोकांचा इतर लोकांवर खूप मोठा प्रभाव असतो.इतकेच नाही तर मधले बोट हे व्यक्तीच्या अनामिका सारखे असावे.

2- मधले बोट मोठे असणे- काही व्यक्तींचे मधले बोट मोठे असते व असे लोक कष्ट करायला कधीच कमी पडत नाहीत. हे व्यक्ती कुठलेही काम अगदी मनापासून पूर्ण करतात व त्यांच्या मेहनतीच्या जोरावर त्यांना प्रत्यक्षात यश नक्की मिळते. जर त्यांची बोटे वाकडी असतील तर मात्र त्यांना काही गोष्टी समजायला थोडा वेळ लागतो.

3- अंगठी लांब असणे- काही व्यक्तींच्या हाताची अंगठी लांब असते व असे लोक सर्जनशील कार्यामध्ये भरपूर यश मिळवतात. तसेच आयुष्यामध्ये लोकांना भरपूर संपत्ती मिळते व समाजात खूप मानसन्मान देखील प्राप्त होतो. परंतु जर काही लोकांची अंगठी जर लहान असली तर त्यांना आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी खूप संघर्ष करावा लागतो.

4- अंगठा जाड असणे- काही लोकांचा अंगठा खूप जाड असतो व असे लोक हे खूप रागीट असतात व अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर रागावतात. परंतु कोणत्याही बाबतीत योग्य तो निर्णय घेतात आणि बरेच लोक सल्ल्याकरिता त्यांच्याकडे येतात. तसेच लांब अंगठा हे एखाद्या व्यक्तीचे कार्यक्षम आणि आत्मविश्वासाचे प्रतीक देखील समजले जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe