Home Care Tips:- घरातील आणि घराच्या अवतीभोवतीची स्वच्छता याचा थेट संबंध हा व्यक्तीच्या आरोग्याशी येतो व त्यामुळे स्वच्छतेला प्राधान्य क्रमाने महत्त्व देणे खूप गरजेचे असते. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे या कालावधीत ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचलेले असतात व ओलसरपणा असल्याने मोठ्या प्रमाणावर घरामध्ये माशा घोंगावतात.
तसेच डासांचे प्रमाण देखील वाढते. आपल्याला माहित आहे की घरामध्ये जर माशांचे प्रमाण वाढले तर ते अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांवर देखील बसतात व त्यांच्या पायांना चिकटलेल्या बारीक सूक्ष्मजीव किंवा घाणेमुळे खाद्यपदार्थ देखील खराब होतात किंवा अशी खाद्यपदार्थ खाल्ल्याने आपल्याला अनेक आरोग्य विषयक समस्या उद्भवू शकतात.

त्यामुळे घरामध्ये माशा होऊ नये त्याकरिता आपण अनेक प्रकारचे प्रयत्न करत असतो. याव्यतिरिक्त पावसाळ्यात डासाचे प्रमाण देखील वाढते व मोठ्या प्रमाणावर डास चावल्याने आरोग्य विषयक समस्या उद्भवतात. अशाप्रकारे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या माशा आणि डासांचा उपद्रव कमी व्हावा म्हणून आपण अनेक प्रकारच्या उपाययोजना करतो.
परंतु अपेक्षित परिणाम आपल्याला दिसून येत नाही. परंतु जर तुम्ही फरशी पुसण्यासाठी जे पाणी घेतात त्यामध्ये जर काही पदार्थ मिक्स केले व त्या पाण्याने जर घराची फरशी पुसली तर घरातील माशा आणि डास दूर होण्यास मदत होते.
पाण्यात हे पदार्थ मिसळा आणि घरातील फरशी पुसा, माशा आणि डास पळतील दूर
1- व्हिनेगरचा वापर– जेव्हा तुम्ही घरातील फरशी पुसण्यासाठी पाणी घेता तेव्हा त्या पाण्यामध्ये जर व्हिनेगर मिसळले तर फायदा होतो. या पाण्याने तुम्ही घर व्यवस्थित पुसून टाकावे. घर पुसल्यानंतर पाण्यात टाकलेल्या विनेगर मुळे घरभर वास पसरतो व या वासामुळे घरात माशा आणि इतर कीटक येत नाहीत. एवढेच नाही तर घरात आडोशाला लपलेले डास देखील या माध्यमातून दूर पळतात.
2- फिनाईलचा वापर– फरशी पुसण्यासाठी जे पाणी वापराल त्यामध्ये जर तुम्ही फिनाईलचे थेंब टाकले तर फायदा होतो. अशा पाण्याने तुम्ही घर नीट पुसून टाकावे. फिनाईलच्या वासामुळे माशा आणि किडे तसेच डास घरातून लांब पडतात.
3- पाण्यामध्ये मीठ आणि बेकिंग सोड्याचा वापर– फरशी पुसण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये जर तुम्ही मीठ आणि बेकिंग सोडा वापरावा व त्या पाण्याने संपूर्ण घर पुसून टाकावे. या उपायाने देखील पावसाळ्यात येणारे अनेक किडे तसेच माशा व डास घरात येत नाहीत.
4- या गोष्टीवर अवश्य लक्ष द्या– यामध्ये हे उपाय कराच. परंतु घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. त्यामध्ये कचरा असेल तर तो दररोज फेकून द्या. घरामध्ये स्वच्छता ठेवा. इतकी जरी काळजी घेतली तरी पावसाळ्यामध्ये डोळ्यांना माशा आणि डास देखील दिसणार नाहीत.