रक्तातील साखर वाढली तर शरीर देते ‘हे’ संकेत! नका करू दुर्लक्ष नाहीतर पडेल महागात, वाचा काय म्हणतात तज्ञ?

मधुमेह म्हणजेच डायबिटीस हा आजार पाहिला तर हा जडण्यामागील प्रमुख कारण जर बघितले तर खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाची कमतरता तसेच बिघडलेली जीवनशैली यामध्ये आहे. आपल्याला माहिती आहे की, डायबिटीस झाल्यानंतर रक्तामध्ये साखर वाढणे किंवा ती कमी होणे इत्यादी गोष्टी होतात.

Ajay Patil
Published:
blood suger level

धावपळीची जीवनशैली आणि ताणतणावाचे आयुष्य याचा खूप मोठा विपरीत परिणाम हा व्यक्तीच्या आरोग्यावर होत असतो. तसेच खाण्यापिण्याच्या बदललेल्या वेळा आणि सवयी त्यामुळे देखील अनेक आजारांना आमंत्रण मिळाल्याचे आपल्याला दिसून येते व अशा गोष्टींमुळे हृदयरोग तसेच  उच्च रक्तदाब व मधुमेह म्हणजे डायबिटीस सारख्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर अनेक जणांना झाल्याचे आपण पाहतो.

यामध्ये जर आपण मधुमेह म्हणजेच डायबिटीस हा आजार पाहिला तर हा जडण्यामागील प्रमुख कारण जर बघितले तर खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाची कमतरता तसेच बिघडलेली जीवनशैली यामध्ये आहे. आपल्याला माहिती आहे की, डायबिटीस झाल्यानंतर रक्तामध्ये साखर वाढणे किंवा ती कमी होणे इत्यादी गोष्टी होतात

व त्यामुळे खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यायला लागते. डायबिटीज झाला तर अनेक प्रकारची काळजी घेणे गरजेचे असते. रक्तामधील साखर वाढणे हे डायबिटीस होण्यामागील प्रमुख कारण आहे. परंतु तज्ञ म्हणतात की,जेव्हा शरीरात साखर किंवा शर्करा वाढते त्या आधी शरीर आपल्याला काही संकेत देत असते.

परंतु कामाच्या दगदगीत किंवा ताण-तणावात आपण त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करतो व रक्तातील ही वाढलेली साखर मधुमेहाचे रूप घेते व आयुष्यभर आपल्याला त्याचा त्रास होतो. त्यामुळे रक्तातील साखर वाढण्याआधी शरीर कोणते संकेत देते? हे आपल्याला समजणे खूप गरजेचे आहे.

 डायबिटीज असल्यास किंवा रक्तातील साखर वाढल्यास दिसून येतात ही संकेत

1- पायांमध्ये वेदना होऊ शकतात जेव्हा व्यक्तीला मधुमेहाची लागण होते तेव्हा अशा रुग्णांच्या पायांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये दुखायला लागते.म्हणजेच पायांमध्ये वेदना निर्माण व्हायला लागतात व पायांना सूज देखील येऊ शकते. ही स्थिती उत्पन्न झाल्यामुळे काही वेळा पाय सुन्न देखील पडतात. त्यामुळे असे काही होत असेल तर याकडे मुळीच दुर्लक्ष करू नये.

2- डोळ्यांची दृष्टी कमी होऊ शकते समजा तुम्हाला जर दिसायला अंधुक दिसू लागले तर हे देखील एक डायबिटीसचे लक्षण असण्याची दाट शक्यता असते. जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त प्रमाणामध्ये वाढते तेव्हा डोळ्यांना स्पष्टपणे दिसत नाही व अंधुक दिसायला लागते.

3- जास्त तहान लागायला लागते लघवी देखील जास्त प्रमाणात होते समजा आपण नॉर्मल जे पाणी पितो आणि त्यापेक्षा जर आपण जास्त पाणी प्यायला लागलो तर समजा हे देखील मधुमेहाचे लक्षण असल्याची शक्यता आहे. घसा नेहमी कोरडा पडत असतो व त्यामुळे आपल्याला सतत तहान लागते व वारंवार लघवीला देखील जायला लागते.

4- भूक जास्त लागणे समजा तुम्ही जेवण केले तरी देखील तुम्हाला असे वाटू शकते की तुम्ही जेवणच केले नाही. जेव्हा असे वाटायला लागते त्या मागील प्रमुख कारण म्हणजे साखर आपल्या पेशींच्या  माध्यमातून पुरेशा प्रमाणात शोषली जात नाही आणि त्यामुळे  त्यांना ऊर्जा मिळत नाही व ही परिस्थिती त्यामुळे निर्माण होते.

5- वजन कमी होण्याची शक्यता एखाद्या व्यक्तीला जर डायबिटीज झाला तर अशा लोकांनी पुरेसे जेवण केले तरीदेखील त्यांना वजन कमी होण्याचे समस्या दिसून येते. त्यामुळे या गोष्टीकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे.

6- त्वचेचा पोत बदलू शकतो जेव्हा एखाद्या व्यक्तीला डायबिटीस होतो तेव्हा त्याच्या पायाच्या तळव्यांची त्वचा कठीण व्हायला लागते व अशा प्रकारचा अचानक बदल जर तुम्हाला दिसून आला तर तुम्ही काळजी घेणे गरजेचे आहे व डॉक्टरांना भेटणे महत्त्वाचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe