जर तुम्ही ऍक्टिव्हेट केली ‘ही’ सर्विस तर बँकेत ठेवलेल्या पैशांवर मिळेल तीन पट जास्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाची माहिती

फिक्स डिपॉझिटच्या स्वरूपात देखील अनेक जण ठेव ठेवतात व या दोन्हीमध्ये बचत खात्यावरील व्याजदर वेगळा असतो आणि फिक्स डिपॉझिट अर्थात एफडीवर मिळणारा व्याजदर हा वेगवेगळा असतो. दुसरे महत्त्वाचे म्हणजे बँकेच्या माध्यमातून देखील खातेधारकांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जात असतात.

Ajay Patil
Published:

Benefit To Auto Sweep Service:- बँकेमध्ये सध्या प्रत्येकाचे बचत खाते आहे आणि केंद्र सरकारने जेव्हापासून जनधन योजना सुरू केली. तेव्हापासून साधारणपणे बँक खातेधारकांची संख्या मोठ्या प्रमाणावर संपूर्ण देशात वाढल्याचे दिसून आले आहे. बँकेमध्ये ज्याप्रमाणे बचत खात्यात पैसे ठेवले जातात.

अगदी त्याचप्रमाणे फिक्स डिपॉझिटच्या स्वरूपात देखील अनेक जण ठेव ठेवतात व या दोन्हीमध्ये बचत खात्यावरील व्याजदर वेगळा असतो आणि फिक्स डिपॉझिट अर्थात एफडीवर मिळणारा व्याजदर हा वेगवेगळा असतो. दुसरे महत्त्वाचे म्हणजे बँकेच्या माध्यमातून देखील खातेधारकांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जात असतात.

परंतु बऱ्याच खातेदारांना दिल्या जाणाऱ्या सुविधांबद्दल पुरेशी माहिती नसल्याकारणाने अशा सुविधांचा लाभ घेतला जात नाही. या सुविधांच्या दृष्टिकोनातून बघितले तर बँकेच्या माध्यमातून देण्यात येणारी एक सुविधा म्हणजे ऑटो स्विप सर्विस ही सुविधा होय.

ही एक बँक खातेधारकांसाठी बँकेकडून देण्यात येणारी खूप महत्त्वपूर्ण अशी सुविधा असून या सुविधेचा वापर केल्यास खातेधारकांना जमा रकमेवर जास्तीत जास्त व्याजाचा फायदा मिळू शकतो.

काय आहे नेमकी ऑटो स्विप सर्विस?
ही एक महत्वपूर्ण सुविधा असून बँक खातेधारकांना सरप्लस फंडवर अधिक व्याज मिळवून देण्यासाठी फायद्याची आहे. जर खातेधारकांनी ही सुविधा ऍक्टिव्हेट केली तर बचत खात्यांमधील जमा रक्कम एका मर्यादेपेक्षा जास्त असेल किंवा सरप्लस फंड स्वरूपात असेल तर आपोआप फिक्स डिपॉझिट अर्थात एफडीमध्ये पैसे ट्रान्सफर केले जातात.

त्यामुळे बचत खात्यामध्ये जे काही व्याज मिळते त्याऐवजी बँक मुदत ठेव म्हणजे एफडीवर मिळणाऱ्या जास्त व्याजदराचा फायदा बँक खातेधारकांना मिळतो. समजा तुम्ही यामध्ये जर 20 हजार रुपयांची एफडी केलेली आहे आणि त्याच खात्यामध्ये साठ हजार रुपये डिपॉझिट केले तर आऊटो स्विपच्या माध्यमातून वीस हजार रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम म्हणजे 40000 रुपये एफडीमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्सफर होतात

व त्या चाळीस हजार रुपयाला एफडीला जे व्याजदर लागू आहेत ते लागू होतात आणि 60000 पैकी उरलेल्या 20000 वर बचत खात्याचे जे व्याजदर आहे ते लागू असतात.

आपल्याला माहित आहे की बचत खात्यावर दोन ते अडीच टक्क्यांपर्यंत व्याज मिळते आणि मुदत ठेवीवर साडे सहा ते सात टक्क्यांपर्यंत व्याज मिळते.

अशाप्रकारे तुम्ही साधारणपणे तीनपट व्याजदराचा लाभ मिळवू शकतात. ऑटो स्विप सुविधे अंतर्गत तुम्हाला स्वतः जाऊन पैसे मुदत ठेव खात्यामध्ये ट्रान्सफर करण्याची गरज भासत नाही. ते पैसे ऑटोमॅटिक त्या खात्यात ट्रान्सफर केले जातात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe