Canara Bank Job 2024: पदवीधर असाल तर कॅनरा बँकेत आहे नोकरीची सुवर्णसंधी! भरल्या जाणार तब्बल ‘इतक्या’ जागा, जाणून घ्या माहिती

बँकेच्या भरतीची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी हा एक चांगला कालावधी आहे. अगदी याच पद्धतीने जर आपण बघितले तर देशातील महत्त्वाच्या असलेल्या कॅनरा बँकेत देखील नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेली असून या बँकेत सध्या अप्रेंटिस पदांकरिता भरती सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे पदवीधर असलेल्या उमेदवारांनी या भरती करिता अर्ज करणे गरजेचे आहे.

Ajay Patil
Published:
bank bharati

Canara Bank Job 2024:- तुम्ही देखील पदवीधर आहात आणि विविध भरती परीक्षांची तयारी करत असाल व त्यातल्या त्यात जर तुम्ही बँकेच्या विविध परीक्षांची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तसे पाहायला गेले तर सध्या राज्यामध्ये किंवा देशात विविध बँकांच्या माध्यमातून अनेक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेल्या असून त्यातील काही भरतीच्या संदर्भातील अर्ज प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे.

त्यामुळे या कालावधीत बँकेच्या भरतीची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी हा एक चांगला कालावधी आहे. अगदी याच पद्धतीने जर आपण बघितले तर देशातील महत्त्वाच्या असलेल्या कॅनरा बँकेत देखील नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेली असून या बँकेत सध्या अप्रेंटिस पदांकरिता भरती सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे पदवीधर असलेल्या उमेदवारांनी या भरती करिता अर्ज करणे गरजेचे आहे.

 कॅनरा बँकेत तब्बल 3000 रिक्त पदांसाठी होत आहे भरती

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कॅनरा बँकेच्या माध्यमातून सध्या नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली असून या बँकेत अप्रेंटिस पदासाठीच्या तब्बल 3000 पदांसाठी ही भरती सुरू करण्यात आलेली असून कॅनरा बँकेच्या माध्यमातून या भरतीबद्दलची अधिसूचना देखील जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे पात्र व इच्छुक असलेल्या उमेदवारांना जर अर्ज करायचा असेल तर ते या बँकेच्या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

 काय आहे शैक्षणिक पात्रता?

कॅनरा बँकेच्या माध्यमातून तब्बल 3 हजार अप्रेंटिस पदे भरण्यासाठी ही भरती जाहीर करण्यात आलेली असून याबाबत बँकेने अधिसूचना देखील जाहीर केलेली आहे व त्यानुसार बघितले तर जे विद्यार्थ्यांनी पदवी म्हणजेच ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त करणे गरजेचे आहे.

 काय आहे या भरतीसाठीची आवश्यक वयोमर्यादा?

कॅनरा बँकेच्या माध्यमातून 3000 हजार अप्रेंटिस पदांसाठी जी भरतीच्या अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे त्यानुसार बघितले तर या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक व पात्र असतील त्यांचे वय हे 20 ते 28 वयोगटातील असणे गरजेचे आहे. असे जे उमेदवार राखीव प्रवर्गातील असतील अशा उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देखील देण्यात आलेली आहे.

 काय आहे भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख?

कॅनरा बँकेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी ज्या इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करायचे असतील ते 4 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत व ही तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तसे पाहायला गेले तर कॅनरा बँकेच्या माध्यमातून अप्रेंटिस पदासाठी राबवण्यात येणाऱ्या या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया 21 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे.

 अधिक माहितीसाठी या ठिकाणी साधावा संपर्क

तुम्हाला देखील कॅनरा बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठीची अधिकची माहिती हवी असेल तर तुम्ही बँकेच्या canarabank.com या वेबसाईटवर जाऊन माहिती घेऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe