जून महिन्यामध्ये टाटाची ‘ही’ इलेक्ट्रिक कार खरेदी कराल तर होईल 1 लाख रुपयांचा फायदा! मिळत आहे बंपर सूट

Published on -

सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे अनेकजण आता इलेक्ट्रिक कार तसेच इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आपल्याला दिसून येते व यामध्ये दिवसेंदिवस इलेक्ट्रिक कार खरेदी कडे देखील ग्राहकांचा कल मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र आहे व या पार्श्वभूमीवर वाहन उत्पादक कंपन्या देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करत आहेत.

जर आपण वाहन उत्पादक कंपन्यांची यादी पाहिली तर यामध्ये टाटा मोटर्स ही अग्रगण्य कंपनी असून या कंपनीच्या माध्यमातून कमर्शियल वाहनांपासून तर प्रवासी वाहने, कार उत्पादित केल्या जातात व एवढेच नाही तर टाटा मोटर्स इलेक्ट्रिक कार देखील उत्पादित करते.

टाटाचे इलेक्ट्रिक कार बद्दल पाहिले तर टाटाची टियागो EV एक वैशिष्ट्यपूर्ण अशी कार असून या कारमध्ये अनेक उत्कृष्ट अशी फिचर देण्यात आलेले आहेत. तुम्हाला देखील टाटाची इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल तर तुम्ही ही कार खरेदी करू शकतात

व महत्त्वाचे म्हणजे टाटा मोटर्स कडून या इलेक्ट्रिक कारवर जून 2024 मध्ये आकर्षक ऑफर देण्यात येत असून या माध्यमातून या महिन्यात जर ही कार खरेदी केली तर ग्राहकांना तब्बल एक लाखाचा फायदा मिळणार आहे.

MY2023 टियागो EV वर मिळत आहे बंपर सूट

टाटा मोटर्सच्या टियागो ईव्हीच्या MY2023 या मॉडेलच्या सर्व प्रकारांवर या महिन्यांमध्ये कंपनीच्या माध्यमातून तब्बल 95 हजार पर्यंत सूट देण्यात आली असून गेल्या महिन्यापेक्षा थोडी जास्त आहे.

त्यासोबतच MY2024 टियागो EV च्या लॉंग रेंज व्हेरिएंटवर 75 हजार पर्यंतचे फायदे ऑफर केले गेले असून जे गेल्या महिन्यात 52 हजार पेक्षा जास्त आहेत. एवढेच नाही तर या कारच्या मिड व्हेरियंटवर 60 हजार रुपयापर्यंत सूट दिली जात आहे.

 किती आहे या कारची किंमत?

टाटा टियागो EV ची किंमत ही सात लाख 99 हजार रुपयांपासून सुरू होते आणि अकरा लाख 89 हजार रुपये पर्यंत जाते.

 कसा आहे या कारमध्ये देण्यात आलेला बॅटरी पॅक आणि त्याची श्रेणी?

टाटा टियागो इलेक्ट्रिक कार ही 19.2kWh बॅटरी पॅकसोबत 250 किलोमीटरची रेंज देते तर 24kWh बॅटरी पॅक सह ही कार 315 किलोमीटर पर्यंत ची रेंज कव्हर करते.

त्यामुळे जर तुम्हाला देखील इलेक्ट्रिक कार घ्यायची असेल तर जून महिन्यात टाटाची ही टियागो EV घेतली तर नक्कीच तुमचा भरपूर पैसा यामध्ये वाचू शकतो व तुमचे कारचे स्वप्न देखील पूर्ण होऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News