Share Market Update:- भारतातील सगळ्यात महत्त्वाचा सण समजला जाणारा दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असून येत्या एक नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशामध्ये उत्साहाने दिवाळी सण साजरा केला जाईल.
महत्वाच्या अशा दिवाळी सणाचे मंगलमय आणि आल्हाददायक वातावरण आत्ताच तयार व्हायला लागले आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. याच दिवाळीच्या दिवशी म्हणजेच ज्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे त्या दिवशी शेअर बाजारामध्ये कोणत्याही स्वरूपाचे कामकाज होणार नाहीये.
परंतु संध्याकाळी एक तासासाठी विशेष ट्रेडिंग सत्र आयोजित करण्यात आलेले असून यानिमित्ताने ब्रोकरेज आनंद राठी यांनी जवळपास काही शेअर्सची लिस्ट जारी केली असून या शेअर्सचा समावेश तुमच्या पोर्टफोलिओमध्ये करू शकतात.
या शेअरची निवड तांत्रिक बाबींच्या आधारे केली असून येणाऱ्या पुढच्या एक वर्षात गुंतवणूकदारांना यामधील गुंतवणूक चांगला नफा मिळवून देऊ शकते असे त्यांचे मत आहे. नेमके त्यांनी कोणते शेअर्सची यादी जाहीर केली आहे त्याबद्दलची माहिती बघू.
या शेअर्समधील गुंतवणूक एका वर्षात देऊ शकते चांगला परतावा?
1- हिंदुस्तान झिंक– जर आपण हिंदुस्थान झिंकचा स्टॉक बघितला तर तो 780 रुपयांचा उच्चांक गाठल्यानंतर काही महिन्यांपासून घसरत होता. मात्र सध्या तो 470 रुपयांच्या पातळीवर आधार घेताना दिसत असून या पातळीवर हा शेअर्स नवीन ब्रेक आउटची चिन्हे दर्शवत असल्याने येणाऱ्या काळात या शेअर्समध्ये वाढ अपेक्षित असल्याचे ब्रोकरेजने म्हटले आहे.
या अनुषंगाने आनंद राठी यांनी गुंतवणूकदारांना पोर्टफोलिओ मध्ये किमान एक वर्षासाठी या स्टॉकचा समावेश करावा असा महत्त्वाचा सल्ला दिला असून यासाठीची टारगेट प्राईज 680 ते 750 रुपयांची निश्चित केली आहे.
2- टाटा टेक्नॉलॉजीज– टाटा समुहाची ही कंपनी असून मागच्या एक वर्षांपूर्वी बाजारामध्ये लिस्ट झाली आहे. या लिस्टिंग वर या शेअर्सने भरपूर नफा दिला असून लिस्टिंग वर साधारणपणे या शेअर्सने 1400 रुपये पर्यंत मजल मारली.
त्यानंतर मात्र त्यामध्ये सातत्याने घसरण होत राहिली. आज जर आपण बघितले तर या स्टॉकची किंमत 1000 रुपयांपेक्षा कमी असून या पार्श्वभूमीवर ब्रोकरेज यांनी म्हटले आहे की आता हा शेअर्स ब्रेक आऊटची नवीन चिन्ह दाखवत असल्याने पुन्हा उच्चांक गाठू शकतो.
त्यामुळे येत्या दिवाळीसाठी हा शेअर्स एका वर्षासाठी विकत घेण्याचा सल्ला देण्यात आला असून त्यासाठीची टारगेट प्राईज 1360 ते १४५० रुपये निर्धारित केली आहे.
3- गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स– मार्च ते जुलै 2024 या कालावधीमध्ये या स्टॉकने चांगली तेजी नोंदवली होती व याचे दर 700 रुपयांवरून थेट एक हजार रुपयांपर्यंत गेले होते.
परंतु गेल्या काही महिन्यांपासून शिपिंग उद्योगाशी संबंधित बहुतेक शेअर्समध्ये पडझड नोंदवली जात असून गार्डन रिच शिप बिल्डर्सचे शेअर्स उच्चंकी पातळीवरून तब्बल 45 टक्क्यांनी घसरले आहेत.
परंतु आता या शेअर्समध्ये वाढ होण्याची चिन्हे दिसून येत असल्याने ब्रोकरेजने एक वर्षाच्या कालावधी करिता पोर्टफोलिओ मध्ये हा शेअर्स ठेवण्याचा सल्ला दिला असून त्याकरिता टारगेट प्राईज 2425 ते 2650 रुपये निर्धारित करण्यात आली आहे.
4- भारत अर्थमूव्हर्स लिमिटेड– काही दिवसांपासून संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये देखील घसरण पाहायला मिळत आहे व त्या अनुषंगाने भारत अर्थमूव्हर्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये देखील त्याच्या उच्चांकापासून जवळजवळ 35 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
परंतु आता 50 आठवडे इएमए आणि 200 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एवरेज वर आधार घेत असल्यामुळे अशा स्थितीत हा शेअर्स दीर्घ मुदतीसाठी पोर्टफोलिओमध्ये ठेवण्याचा सल्ला देण्यात आला असून त्याकरिता चार हजार आठशे ते पाच हजार चारशे रुपयांचे टार्गेट प्राईज देण्यात आली आहे.
5- जुपिटर वॅगन्स– हा शेअर्स रेल्वेशी संबंधित असून यामध्ये देखील 746 रुपयांच्या उच्चांकी पातळीवरून 40% घसरण झालेली आहे. परंतु सध्या घसरत्या ट्रेंड लाईन मधून ब्रेकआउट देखील दैनंदिन चार्टवर दिसल्याने या शेअर्समध्ये एका वर्षाकरिता गुंतवणूक करण्याचा सल्ला ब्रोकरेजच्या माध्यमातून देण्यात आला असून त्याकरिता 700 ते 760 रुपयांचे टारगेट प्राईज निश्चित करण्यात आली आहे.