Chorla Ghat Hill Station:- भारतामध्ये प्रसिद्ध असलेले जे काही पर्यटन स्थळे आहेत त्यामध्ये गोवा हे एक सर्वात लोकप्रिय आणि पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेले पर्यटन स्थळ आहे. गोव्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर देशातील पर्यटकच नव्हे तर देश-विदेशातील अनेक पर्यटकांसाठी एक लोकप्रिय असे डेस्टिनेशन आहे.
या ठिकाणी असलेले सुंदर असे समुद्रकिनारी आणि या ठिकाणचे नाईट लाईफ खूपच प्रसिद्ध असून अशा प्रकारचे नाईट लाईफ एन्जॉय करायला जास्त प्रमाणात पर्यटकांची या ठिकाणी गर्दी होत असते. गोव्याला तुम्ही कधीतरी गेला तरी तुम्हाला त्या ठिकाणी गर्दी दिसून येते. इतकेच नाही तर वन्य प्राण्यांसाठी देखील गोवा हे एक आवडते महत्त्वाचे असे डेस्टिनेशन आहे.
या सगळ्या अनुषंगाने जर तुम्हाला देखील गोवा फिरायला जायचे असेल तर तुम्ही नक्कीच जा. परंतु गोव्यापासून अवघे 65 ते 68 किलोमीटर अंतरावर असलेले चोरला घाट हे हिल स्टेशन पाहायला विसरू नका.
या ठिकाणाचे नैसर्गिक सौंदर्य नक्कीच मनाला भुरळ घालते. चोरला घाट हे हिल स्टेशन गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग चार वर आहे.
चोरला घाटात काय आहे पाहण्यासारखे?
तुम्ही चोरला घाट पाहायला गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला अनेक नैसर्गिक सुंदर असे दृश्य पाहायला मिळतात. या ठिकाणी असलेले उत्तम आणि सुंदर असे धबधबे आणि त्यासोबतच त्या ठिकाणी असलेल्या म्हादई वन्यजीव अभयारण्यामध्ये मलबार व्हीसलिंग थ्रश सारखे अनेक दुर्मिळ पक्षी बघायला मिळतात.
तसेच तुम्हाला सहासी ऍक्टिव्हिटीज करायला आवडत असेल आणि ट्रेकिंगची आवड असेल तर या ठिकाणी असलेला लासनी टेंब आणि वज्र धबधब्याच्या शिखरावर जाऊन तुम्ही ट्रेकिंग देखील करू शकता.
महाराष्ट्राला लाभलेल्या सह्याद्री पर्वतरांगेचाच चोरला घाट एक भाग आहे व त्यालाच पश्चिम घाट असे देखील म्हणतात. चोरला घाट या ठिकाणी असलेली हिरवीगार जंगल आणि प्राणी पक्षांचे वास्तव्य खूप महत्त्वाचे आहे व येथील निसर्गसौंदर्य खूपच पाहण्यासारखे आहे.
चोरला घाटला कसे जाता येईल?
चोरला घाट गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांशी कनेक्ट असून तुम्ही तुमच्या बजेटनुसार रस्ते किंवा रेल्वे मार्गाने जाऊ शकतात. जर तुम्हाला बसने जायचे असेल तर हा देखील एक बेस्ट असा ऑप्शन आहे व तुम्हाला तो सोईस्कर आणि किफायतशीर ठरेल.
चोरला घाट येथे ये जा करण्याकरिता अनेक बसेस सहजपणे उपलब्ध होतात. जर ट्रेनने प्रवास करायचा असेल तर हा देखील एक उत्तम ट्रॅव्हलिंग मोड असून चोरला घाट या ठिकाणी थेट ट्रेन उपलब्ध नाही. गोव्यापर्यंत तुम्हाला ट्रेनने जाता येते व त्यानंतर तुम्ही टॅक्सी किंवा बसने चोरला घाट या ठिकाणी पोहोचू शकतात.